भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने पहिला सामना खिशात घालत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडत असतानाच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी टीव्हीवर स्टिंग ऑपरेशनमध्ये केलेल्या वक्तव्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत होते. त्यानंतर त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता बीसीसीआय नवीन अध्यक्षाच्या शोधात आहे.
चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी भारतीय खेळाडूंवर इंजेक्शन घेण्याचा आरोप लावला होता. तसेच, माजी कर्णधार विराट कोहली यालादेखील ‘खोटारडा’ म्हटले होते. आता बीसीसीआय नव्या अध्यक्षाच्या शोधात आहे, ज्यांचे पहिले लक्ष हे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांवर असेल. जानेवारीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. अशात आता उर्वरित दोन सामन्यांसाठी संघाची निवड होणे बाकी आहे.
चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवे अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत एक नाव अव्वलस्थानी असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे कसोटीचा अनुभवदेखील आहे.
माजी फलंदाजाला मिळू शकते अध्यक्षपद
माध्यमांतील वृत्तांनुसार, निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी शिव सुंदर दास (Shiv Sundar Das) यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीदेखील केली आहे. तसेच, ते सध्याच्या पाच सदस्यीय पॅनेलचे सदस्यही आहेत. जानेवारी महिन्यात नवीन समितीची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांची फेरनिवड झाली होती. टी20 विश्वचषकानंतर बरखास्त करण्यात आलेल्या समितीमध्ये त्यांच्या नावाचाही समावेश होता. सध्या निवड समितीमध्ये सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांच्या नावाचीही चर्चा आहे.
पॅनेलमधूनच निवडला जाणार नवीन अध्यक्ष
आता असे म्हटले जात आहे की, बीसीसीआय थेट सध्याच्या पॅनेलमधून अंतरिम अध्यक्षाची निवड करण्यावर विचार करू शकते. अशात भारतीय संघाचे माजी सलामीवीर शिव सुंदर दास हे या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. त्यांनी 23 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. (shiv sundar das can be selected in place of chetan sharma for the chairmanship of the bcci selection committee read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टेन्शन वाढलं! दिल्ली कसोटीत बलाढ्य संघाला झटका; चालू सामन्यातून दमदार खेळाडू होणार बाहेर? कारणही गंभीर
आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच रॉयल्सला धक्का, प्रमुख गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर