आयपीएल 2024 च्या 18 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा केल्या. हैदराबादविरुद्ध चेन्नईचा एकही खेळाडू मोठी खेळी खेळू शकला नाही. रचिन रवींद्र 12 तर कर्णधार ऋतुराज गायकवाड 26 धावा करून बाद झाले. अजिंक्य रहाणेनं जरी 35 धावा केल्या असल्या तरी त्यासाठी त्यानं 30 चेंडू खेळले.
मात्र या सर्वांच्या उलट स्टार अष्टपैलू शिवम दुबेची बॅट पुन्हा एकदा तळपली. शिवम दुबेनं मैदानात पाऊल ठेवताच चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. या सामन्यात शिवम दुबेचं अर्धशतक अवघ्या 5 धावांनी हुकलं, परंतु त्यानं आपल्या खेळीनं सर्वांची मने जिंकली आहेत. शिवम दुबेच्या या कामगिरीनंतर 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळावं अशी मागणी चाहते करू लागले आहेत.
हैदराबादच्या मैदानावर शिवम दुबेनं शानदार फलंदाजी करत अवघ्या 24 चेंडूत 45 धावा ठोकल्या. त्यानं हैदराबादविरुद्ध 187.5 च्या स्ट्राइक रेटनं 2 चौकार आणि 4 षटकार ठोकले. दुबे आणि अजिंक्य रहाणे यांच्यात 65 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. ज्यामुळे चेन्नईचा संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचला.
आज शिवम दुबे जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. एक वेळ असं वाटत होतं की तो जर क्रिझवर राहिला तर सीएसकेला 200 पेक्षा जास्त धावा करेल. परंतु हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं डावाच्या 14व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शिवम दुबेला बाद केलं. कमिन्सनं त्याला भुवनेश्वर कुमारच्या हाती झेलबाद केलं. त्याची ही आयपीएल कारकिर्दीतील ही 50वी विकेट होती.
आयपीएलच्या मागील हंगामाप्रमाणेच, शिवम दुबे या हंगामातही तुफान फार्मात दिसतोय. त्यानं या हंगामात आतापर्यंत 152 धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 160 राहिला. विशेष म्हणजे, चालू हंगामात तो चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये खेळाडूंच्या दुखापती थांबेना! आता चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणींमध्ये वाढ; कुलदीप यादवची दुखापत गंभीर, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
सलग तीन पराभवानंतर हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात केली पूजा