---Advertisement---

आयपीएल सर्वांसाठी खास; यातूनच टी20 विश्वचषक संघ निवडला जाईल, इंदोर टी-20पूर्वी शिवम दुबेचे वक्तव्य

Shivam-Dube
---Advertisement---

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या शिवम दुबे याने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यांनी शनिवारी (13 जानेवारी) इंदोरमध्ये पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान, त्याने भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषक संघ आणि त्यात आपले स्थान बनवण्याच्या शक्यतांबद्दल देखील बोलले. येथे त्याने टी20 विश्वचषकासाठी भारताचा संघ निवडण्यात आयपीएल 2024 च्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दलही सांगितले.

शिवम दुबे (Shivam Dubey) म्हणाला, “टी-20 विश्वचषक संघात निवड होण्याच्या दृष्टीने आयपीएल 2024 (IPL 2024) ला आपल्या सर्वांसाठी समान महत्त्व आहे. कारण टी-20 विश्वचषकापूर्वी आमच्याकडे फक्त दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने शिल्लक आहेत. आयपीएल हे एक मोठे व्यासपीठ आहे. येथे चांगला खेळ केल्यास राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची संधी मिळते. टी-20 विश्वचषकासाठी आमचे संघ नियोजन आणि संयोजनावर काम सुरू आहे. आम्ही जितके जास्त टी-20 खेळू तितके चांगले काम करू शकू.” (shivam dubey on ipl role in team india t20 world cup 2024 squad preparation)

शिवम दुबे पुढे म्हणाला, “विश्वचषक खेळणे हे संघातील प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते. हे माझ्याही मनात आहे. पण ते अजून खूप दूर आहे. सध्या माझे लक्ष या सामन्यावर आहे. गेल्या सामन्यात मी चांगली कामगिरी केली. मी पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा, सर्व विभागांमध्ये योगदान देण्याचा आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

पहिल्या सामन्यात शिवम दुबे ‘सामनावीर’ ठरला होता. त्याने बॉल आणि बॅट दोन्हीत चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत त्याने दोन षटकात 9 धावा देऊन एक विकेट घेतली. फलंदाजी करताना त्याने 40 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी खेळली. (IPL is special for all This is what the T20 World Cup team will be selected from says Shivam Dubey ahead of the Indore T20)

हेही वाचा

‘जितेश-सॅमसन रोहित शर्माची पहिली पसंती नाहीत?’ माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले धक्कादायक कारण
‘रोहित-हार्दिक यांच्यात अहंकाराचा संघर्ष आहे का?’ पाहा युवराज सिंगकडून काय मिळाले उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---