लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवारी (०७ मे) आयपीएल २०२२मधील ५३वा सामना झाला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेला हा सामना लखनऊने ७५ धावांनी जिंकला. कोलकाता संघ फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगले प्रदर्शन करू शकलेला नाही. परिणामी त्यांना हंगामातील सातव्या पराभवाची चव चाखावी लागली आहे. यादरम्यान कोलकाता संघाकडून वेगवान गोलंदाज शिवम मावी याने खराब गोलंदाजी प्रदर्शन करत नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मावी (Shivam Mavi) डावातील १९वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने टाकलेले हे षटक कोलकाता संघासाठी अतिशय महागडे ठरले आहे. त्याने या षटकात सर्वाधिक ३० धावा (Shivam Mavi Expensive Over) खर्च करत नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मावीच्या या षटकात लखनऊच्या जेसन होल्डर (Jason Holder) आणि मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यांनी खोऱ्याने धावा ओढल्या. स्टॉयनिसने सुरुवातीच्या ३ चेंडूंवर खणखणीत षटकार ठोकले. पहिला चेंडू संथ गतीचा होता, ज्यावर स्टॉयनिसने डीप बॅकवर्ड स्क्वेयर लेगच्या दिशेला षटकार ठोकला. पुढील चेंडूवर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार मारत त्याने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. चौथ्या चेंडूवर कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर याने झेल घेतला आणि स्टॉयनिसच्या खेळीच्या अंत झाला.
परंतु पुढील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर होल्डरने पुन्हा सलग षटकार मारले आणि १२ धावा खात्यात नोंदवल्या. अशाप्रकारे मावीच्या या षटकात लखनऊच्या फलंदाजांनी ३० धावा फटकावल्या. हे कोलकातासाठी सर्वात महागडे षटक ठरले. तसेच कोलकाताकडून एका षटकात सर्वाधिक धावा खर्च करणारा पहिला गोलंदाज बनण्याचा नकोसा विक्रमही मावीच्या नावावर जमा झाला आहे. मावीने या सामन्यादरम्यान ४ षटके गोलंदाजी करताना ५० धावा देत केवळ १ विकेट घेतली आहे.
दुर्देवी बाब म्हणजे, यापूर्वीही मावीने ही नकोशी कामगिरी केली होती. त्याने २०१८ साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एका षटकात २९ धावा खर्च केल्या होत्या. त्याचवर्षी राजस्थान रॉयल्सविरुद्ध एका षटकात त्याने २८ धावा लुटल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थानच्या ‘रॉयल’ विजयानंतर मुंबईचा संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या कसे?
पुजाराची गाडी इंग्लंडमध्ये सुसाट! सलग चौथ्यांचा ठोकलंय ताबडतोड शतक, कामगिरी एकदा पाहाच
पंजाब किंग्जला धूळ चारल्यानंतर संजू सॅमसनने गायले या दोन खेळाडूंचे गुणगान; म्हणाला…