Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजस्थानच्या ‘रॉयल’ विजयानंतर मुंबईचा संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या कसे?

राजस्थानच्या 'रॉयल' विजयानंतर मुंबईचा संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, जाणून घ्या कसे?

May 8, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Mumbai-Indians

Photo Courtesy: Twitter/@imRo45


पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारी (०७ मे) आयपीएल २०२२चा ५२वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.४ षटकातच पंजाबचे लक्ष्य पूर्ण केले आणि ६ विकेट्स राखून सामना जिंकला. हा राजस्थानचा ११ सामन्यांतील सातवा विजय होता. राजस्थानच्या या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

पंजाबविरुद्धचा (RR vs PBKS) हा सामना राजस्थानचा हंगामातील ११ वा सामना होता. त्यापैकी ७ सामने त्यांनी जिंकले आहेत, तर ४ सामने गमावले आहेत. यासह राजस्थानच्या (Rajasthan Royals) खात्यात १४ गुणांची नोंद झाली आहे. सध्या मुंबईचा (Mumbai Indians) संघ १० सामन्यांमध्ये २ विजय मिळवत ४ गुणांसह गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. अजून त्यांना ४ सामने खेळायचे बाकी आहेत. 

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु जर मुंबईने हे ४ पैकी चारही सामने जिंकले, तरीही त्यांचे १२ गुणच होतील. परंतु हंगामातील केवळ ११ सामने खेळूनही गुणतालिकेत ३ स्थानी असलेल्या संघांच्या खात्यात १२ पैकी जास्त गुण आहेत. अशात मुंबईचा संघ या संघांना प्लेऑफसाठी आव्हान देऊ शकणार नाही. तसेच चौथ्या क्रमांकावर असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ११ पैकी ६ सामने जिंकत १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. अशात त्यांनी एक जरी सामना जिंकला तरीही मुंबईच्या आशांना सुरुंग बसेल. एकंदरित मुंबईसाठी प्लेऑफचे सगळे (Mumbai Indians Out Of Playoff) दरवाजे बंद झाले आहेत. 

मुंबईने गमावले सलग ८ सामने 
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघासाठी चालू हंगाम वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. त्यांनी या हंगामातील सुरुवातीचे सलग ८ सामने गमावले आहेत. आयपीएलच्या इतिहासात मुंबई एकमेव संघ आहे, ज्यांनी सुरुवातीचे आठही सामने गमावण्याची नकोशी कामगिरी केली आहे. त्यांना या हंगामात केवळ गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सला पराभूत करता आले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

पुजाराची गाडी इंग्लंडमध्ये सुसाट! सलग चौथ्यांचा ठोकलंय ताबडतोड शतक, कामगिरी एकदा पाहाच

पंजाब किंग्जला धूळ चारल्यानंतर संजू सॅमसनने गायले या दोन खेळाडूंचे गुणगान; म्हणाला…

राजस्थान रॉयल्सकडून मिळालेला पराभव मयंक अगरवालच्या जिव्हारी; म्हणाला, ‘ते आम्हाला जमले नाही…’


ADVERTISEMENT
Next Post
Shivam-Mavi

एका षटकात ३० धावा देत मावीने केकेआरची डुबवली नौका, लाजिरवाणा विक्रमही केला नावे

Delhi-Capitals

आयपीएल ब्रेकिंग! दिल्ली कॅपिटल्सवर पुन्हा कोरोनाचे संकट, सीएसकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाढली डोकेदुखी

Yashasvi-Jaiswal

सात सामन्यांनंतर पुनरागमन करताना जयस्वालची 'यशस्वी' खेळी, 'या' व्यक्तीला दिले श्रेय

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.