भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका पुढील महिन्यापासून सुरू होईल. तत्पूर्वी, काही वरिष्ठ खेळाडू वगळता इतर काही खेळाडू कोणत्या ना कोणत्या लीगमध्ये खेळत आहेत. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये भाग घेत आहे. या लीगमध्ये तो पुरानी दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करत आहे.
रिषभ पंतच्या संघात शिवम शर्मा नावाचा एक क्रिकेटपटू आहे. जो यापूर्वी पंतचा कर्णधार होता. याचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. शिवम शर्माने सांगितले की, त्याने यापूर्वी पंतचा कर्णधार म्हणून काम पाहिले होते. यानंतर आता तो त्याच्याच नेतृत्वाखाली खेळत आहे. यावरून पंतचा क्रिकेटपटू म्हणून किती विकास झाला आहे हे लक्षात येते.
शिवम शर्माने ट्विट करत म्हटले की, ‘रिषभ पंत माझ्या नेतृत्वाखाली 23 वर्षांखालील स्तरावर दिल्लीकडून खेळला. काल मी त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रीमियर लीग खेळलो. एक क्रिकेटर म्हणून त्याची वाढ पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी देवाचे आभार मानतो की त्याने पंतला सुरक्षित, तंदुरुस्त आणि निरोगी ठेवले.’
Rishabh played Under-23 for Delhi under my captaincy & yesterday I played under his captaincy in DPL.
It gives me pleasure to see his growth as a cricketer & I thank God for keeping him safe, fit and healthy 😊#RishabhPant #AdaniDelhiPremierLeagueT20 #CricketTwitter #DPLT20 #X pic.twitter.com/h2F95WoiCa— Shivvam Sharma (@imshivamsharma9) August 18, 2024
दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात रिषभ पंतच्या संघाला दक्षिण दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रथम खेळताना, जुनी दिल्ली संघाने 20 षटकात 197/3 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स संघाने 19.1 षटकात 198/7 धावा करून सामना जिंकला.
या सामन्यात रिषभ पंत सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला आणि नंतर झटपट धावा काढण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट गमावली. त्याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. यानंतर त्यांच्या संघालाही पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी सॅल्यूट, मग बूट हवेत फेकला; विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचे विचित्र सेलिब्रेशन पाहून खदखदून हसाल!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?