पुणे। मुंबई उपनगर टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व सुहाना प्रायोजितएमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट या स्पर्धेच्या मुंबई लीग स्पर्धेत मुलांच्या गटात शिवन त्यागीने अकराव्या मानांकित विहार सोनावणेचा 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
प्रकटेनिस अंधेरी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित अधिराज दुधानेने अश्वथ भुजबळचा 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित वीर चतुरने आदित्य उपाध्येचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला.
मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी, रुमी गादिया, हर्षा देशपांडे, मायरा शेख, शनाया सिंग तमन्ना नायर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुली: दुसरी फेरी:
सृष्टी सूर्यवंशी[1] वि.वि.वान्या अगरवाल 6-0;
रुमी गादिया[6] वि.वि.शौर्या पाटील 6-1;
हर्षा देशपांडे[4]वि.वि.रिया शेट्टी 6-1;
मायरा शेख[3] वि.वि.मैत्री शर्मा 6-1;
शनाया सिंग वि.वि.अनन्या अगरवाल 6-3;
तमन्ना नायर[2] वि.वि.सुजाता ढवळे 6-0;
मुले: दुसरी फेरी:
अधिराज दुधाने[1] वि.वि.अश्वथ भुजबळ 6-1;
शिवन त्यागी वि.वि.विहार सोनावणे[11] 6-3;
यशवंतराजे पवार[8] वि.वि.युवान बजाज 6-0;
वीर चतुर[3] वि.वि.आदित्य उपाध्ये 6-0;
कबीर गुंडेचा[9] वि.वि.शर्विल गंगाखेडकर 6-2;
आरुष खन्ना वि.वि.देव मूर्थी 6-1.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबो! मोईन अलीचा ‘तो’ चौकार पडला पाच लाखाला, आता काय होणार एवढ्या पैशांचं?