---Advertisement---

ओम दळवी मेमोरियल वनप्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज: साहिल मोडक, राघव अगरवाल, अवधूत निलाखे यांची विजयी सलामी

On: शनिवार, मे 21, 2022 4:30 PM
Sahil-Modak
---Advertisement---

पुणे। ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वन प्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात साहिल मोडक, राघव अगरवाल, अवधूत निलाखे, या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात चुरशीच्या लढतीत साहिल मोडकने अरिहन गदियाचा टायब्रेकमध्ये 9-8(9-7) असा संघर्षपूर्ण पराभव केला. राघव अगरवालने वेद परदेशीचा 9-3 असा तर, अवधूत निलाखेने जय जाधवचा 9-0 असा सहज पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

स्पर्धेचे उदघाटन ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी व स्पर्धा संचालक उमेश दळवी आणि औंधमधील जनसेवक नाना वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारुती राऊत, एमएसएलटीए सुपरवायझर प्रणव वाघमारे, कल्पिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
विहान कांगतानी वि.वि.स्वस्तिक मिश्रा 9-6;
विश्वतेज देशमुख वि.वि.सिद्धांत कुडले 9-6;
साहिल मोडक वि.वि.अरिहन गदिया 9-8(9-7);
राघव अगरवाल वि.वि.वेद परदेशी 9-3;
प्रत्युश काळे वि.वि.वेदांत साडेकर 9-7;
कियान पौआ वि.वि.अद्वैत देशमुख 9-0;
अवधूत निलाखे वि.वि. जय जाधव 9-0;
आदिनाथ कचरे वि.वि.सिद्धू अभीर 9-5;
विवान मल्होत्रा वि.वि.आयुश मिश्रा 9-0;
रतन कुबसाद वि.वि.सुमेर मेढी 9-2.

महत्त्वाच्या बातम्या – 

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: अनुष घनबहादूर, रुद्रसेन शिंदे, स्वर्णिम येवलेकर, अर्जुन परदेशी यांची आगेकूच

‘ज्याच्या पार्टीत जास्त मजा येईल’, चाहत्याने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर शास्त्रींचे भन्नाट उत्तर

अखेर दिल्लीविरुद्ध अर्जुन तेंडूलकरचे होणार आयपीएल पदार्पण? अजून कोणी नव्हे जडेजानेच केलाय दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---