महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शिवनेरी सेवा मंडळ, दादर पूर्व आयोजित राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक व महिला स्थानिक गटाची कबड्डी स्पर्धा १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे.
शिवनेरी सेवा मंडळाच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यंदा नगरसेवक कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन दादर पूर्व येथील भवानीमाता क्रीडांगणावर करण्यात आले आहे.
सदर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष व्यावसायिक गटाचे १३ संघ सहभागी झाले आहेत तर स्थानिक महिला गटाचे १४ संघ सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा मॅटवर होणार असून ३ क्रीडांगण बनवली आहेत. पुरुष व महिला विभागात प्रत्येकी ४-४ गटात संघाची विभागणी केली आहे. सुरुवातीला उद्घाटनाला महिलांचे शिवतेज ठाणे विरुद्ध श्रीराम पालघर आणि डॉ. शिरोडकर स्पो मुंबई विरुद्ध अमरहिंद मुंबई सामान्यांनी सुरुवात होईल. तर पुरुष विभागात बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध देना बँक यासामन्यांने सुरुवात होईल.
महिला गट
अ गट: १) शिवशक्ती महिला संघ, मुंबई २) जागृती, पुणे ३) होतकरू, ठाणे
ब गट: १) महात्मा गांधी, उपनगर २) स्वराज्य, उपनगर ३) महात्मा फुले, उपनगर
क गट: १) सुवर्णयुग, पुणे २) अमरहिंद, मुंबई ३) संघर्ष, उपनगर ४) डॉ. शिरोडकर स्पो. मुंबई
ड गट: १) शिवओम, पुणे २) श्रीराम संघ, पालघर ३) शिवतेज, ठाणे ४)अनिकेत संघ, रत्नागिरी
पुरुष गट
अ गट: १) एयर इंडिया, २) बँक ऑफ इंडिया, ३) न्यु इंडिया इन्शुरन्स
ब गट: १) महिंद्रा अँड महिंद्रा, २) सेंट्रल बँक, ३) सेंट्रल रेल्वे (डिव्हिजन)
क गट: १) युनियन बँक, २) मुंबई बंदर, ३) रायगड पोलीस
ड गट: १) देना बँक, २) ठाणे पोलीस, ३) जे.जे. हॉस्पिटल, ४) बँक ऑफ महाराष्ट्र