भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात वादळी खेळी केली. भारतीय संघाने हा सामना 91 धावांनी जिंकला. सूर्यकुमारने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील तिसरे टी20 शतक केले, ज्यासाठी सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. कोणीतरी त्याला एबी डिव्हिलियर्स प्रमाणे खेळत असल्याचे म्हटले. तर काहींनी तो एबीपेक्षाही उत्कृष्ट असल्याचे सांगितले.
श्रीलंकेविरुद्ध राजकोट टी20 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सूर्याने वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही पद्धतीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने 33 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढील 50 धावांसाठी केवळ 12 चेंडू घेत 45 चेंडूवर 6 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने त्याने आपले तिसरे टी20 शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत या सामन्यात 7 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 219 पेक्षा जास्त होता. विशेष म्हणजे त्याने या खेळी दरम्यान असे काही अद्भुत फटके मारले, जे सहसा फलंदाज मारताना दिसत नाहीत.
त्याच्या या खेळाने प्रभावित होऊन पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी तो एबी डिव्हिलियर्स याच्यापेक्षाही उत्कृष्ट असल्याचे म्हटलेले. डिव्हिलियर्स असाच बेधडकपणे आणि विविध फटक्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असे त्याने कारण दिलेले.
त्याचवेळी आता भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यानेदेखील सूर्या हाच डिव्हिलियर्सपेक्षा उजवा असल्याचे म्हटले. जडेजा म्हणाला,
“त्यांची खेळाची शैली एकसारखी असल्याने अनेक जण त्यांची तुलना करतात. मात्र, मी त्याला एबीपेक्षा वरचढ म्हणेल. त्याचे कारण आहे सूर्यकुमारचे सातत्य. सूर्यकुमार ज्या सातत्याने धावा काढतोय आणि संघाच्या विजयात निर्णय भूमिका बजावतो हे डिव्हिलियर्सकडून वारंवार पाहायला मिळत नव्हते.”
सूर्यकुमार हा सध्या जागतिक टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी असून, सर्वात वेगवान 1500 धावांचा टप्पा देखील त्याने पार केला आहे.
(Shoaib Akhtar and Ajay Jadeja Said Suryakumar Yadav Better Than AB de Villiers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कॉलेजला गेलो नाही, पण…’, शिक्षण व्यवस्थेविषयी धोनीने स्पष्ट भूमिका
‘मी काय करतोय, हे मला माहितीये…’, पाहा पत्रकाराच्या कोणत्या प्रश्नावर भडकला बाबर आझम