---Advertisement---

‘विश्वचषक २०११च्या सेमी फायनलमध्ये मी असतो, तर भारतीय फलंदाजांची हाडे खिळखिळी केली असती’

On: गुरूवार, जून 10, 2021 6:24 PM
---Advertisement---

सध्याचे युग हे सोशल मिडियाचे युग आहे. कोणीही आजकाल ज्याला त्याला जे आवडते किंवा काही विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात, तर तो सोशल मिडियाचा वापर करतो. यामध्ये चित्रपट कलाकार, राजकारणी आणि खेळाडूसुद्धा काही मागे नाहीत. असाच एक किस्सा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने हल्लीच सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्याने २०११ सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघाबद्दल भाष्य केले आहे.

रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर सर्वात जास्त सोशल मिडियावर वेळ घालवणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. हल्लीच त्याने आपल्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांसोबत गप्पा गोष्टी चालू केल्या. त्यात एका चाहत्याने प्रश्न केला की, जर तुला २०११च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा सामना खेळायची संधी मिळाली असती. तर तू १६३.३ किमीचा वेगवान चेंडू टाकून विक्रम केला असता का? अख्तरने यावर भारतीय चाहत्यांना आवडणार नाही असे उत्तर दिले.

२०११ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मोहाली येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघ २९ धावांनी जिंकला होता. दरम्यान, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर अख्तरने असे दिले की, ‘मी जर भारताविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळलो असतो. तर १६३.३च्या विक्रमाबद्दल माहिती नाही. परंतु, त्या सामन्यात मी २-३ भारतीय फलंदाजांच्या हाताची बोटे किंवा हाडे नक्कीच तोडली असती.’

अख्तरच्या उत्तरला भारतीय समर्थक जाम नाराज झाले असून त्यांचे म्हणणे असे आहे कि, ‘निवृत्त झालेल्या खेळाडूकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही.’ अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अख्तरने आपला कारकिर्दीतला शेवटचा एकदिवसीय सामना श्रीलंकाविरुद्ध खेळला होता. विश्वचषक स्पर्धेसाठी शोएब अख्तरची निवड झाली होती. परंतु त्याला एकही सामन्यांत प्रतिनिधित्व करता आले नाही.

उपांत्यफेरी सामन्याबद्दल बोलल्यास भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने ५० षटकात २६०/९ धावा केल्या होत्या. या सामन्यात सर्वाधिक धावा सचिनने केल्या होत्या. सचिनने सामन्यात ८५ धावा केल्या. त्याला या सामन्याचा ‘मेन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ २३१ धावांवरच गारद झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३५ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा फडकवली होती विजयी पताका

‘त्यांच्यामुळे भारताने २०११ विश्वचषक जिंकला,’ गांगुलीला डच्चू देणाऱ्या प्रशिक्षकाची रैनाकडून स्तुती

टीव्हीवर सचिन तेंडुलकरची फलंदाजी बघून सेहवाग शिकला ‘हा’ फटका, स्वत: विरुनेच केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---