---Advertisement---

२००३ विश्वचषकातील सामन्यापुर्वी मी दवाखान्यात जाऊन गुडघ्यातील पाणी काढून आलो होतो

On: बुधवार, जून 17, 2020 5:10 PM
---Advertisement---

क्रिकेट इतिहासात सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आहे. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखला जाणारा शोएब याने २००३ सालच्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १६१.३ किलोमीटर दर ताशी वेगाने चेंडू टाकला होता. यासह आयसीसी टूर्नामेंटमद्ये १०० मैल दर ताशी वेगाने चेंडू टाकणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला होता. Shoaib Akhtar Reveals That His Knees Blood During Practice

परंतु, शोएबला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. या गोष्टीचा उलगडा शोएबने जवळपास ६ वर्षांपुर्वी सोनी टिव्हीच्या ‘इंटरनमेंट के लिए कुछ भी करेगा’ या शोमध्ये केला होता. तो त्या शोचा होस्ट होता. शोदरम्यान अँकर कृष्णा आणि मोना यांनी शोएबला स्वत:विषयी अश्या गोष्टी सांगण्याचा आग्रह केला होता, ज्या जगाला माहिती नसतील.

यावर उत्तर देत शोएबने सांगितले होते की, “जेव्हा मी गोलंदाजी करत असायचो तेव्हा माझ्या खांद्याची जुडलेली हाडे आत-बाहेर हालत असायची. त्यामुळे माझ्या गोलंदाजीचा वेग ज्याला स्लिंग शॉट म्हणतात, तो खूप जास्त होता. जेव्हा मी खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा १९९६पासून ते २००७पर्यंत माझ्या गुडघ्यातून पाणी आणि रक्त निघत असायचे. मला आठवते की, गेल्या १० वर्षांमध्ये मी कधीही सकाळी चालत बाथरुमला जाऊ शकत नव्हतो. मला घसरत जावे लागायचे.”

“२००३सालच्या आयसीसी विश्वचषकादरम्यान एका सामन्यापुर्वी मी दवाखान्यात जाऊन माझ्या गुडघ्यातील पाणी काढून आलो होतो आणि मग सामना खेळायला गेलो होतो. सामन्यापुर्वीच माझी ही दशा होत असायची. मग विचार करा सामना झाल्यानंतर काय होत असेल? कोणत्याही व्यक्तिच्या यशामागे खूप प्रेरणादायक कहाणी असते. लोकांनी त्यातून काही ना काही शिकायला पाहिजे. स्वत:वर विश्वास ठेवायला पाहिजे. सगळं काही साध्य होतं,” असे पुढे बोलताना शोएब म्हणाला होता.

शोएबने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १६३ वनडे सामन्यात २४७, ४६ कसोटी सामन्यात १७८ आणि १५ टी२० सामन्यात १९ विकेट्स घेतल्या होत्या.

ट्रेंडिंग घडामोडी-

मोठी बातमी: टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये नाही जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर

आणि रोहित म्हणाला, ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक बनल्यानंतर…

‘मी आशा करतो की चीनी सुधारतील’; विरेंद्र सेहवाग भडकला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---