---Advertisement---

गेल्या १० वर्षात तुम्ही क्रिकेटचं अक्षरशः वाटोळ केलंय, शोएब अख्तर कडाडला

On: बुधवार, मे 27, 2020 5:40 PM
---Advertisement---

नवी दिल्ली । जगातील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या विवादात्मक विधानांसाठी ओळखला जातो. त्याने मंगळवारी (२६ मे) आयीसीसीवर आरोप करत म्हटले की, आयसीसीने क्रिकेटला उद्ध्वस्त केले आहे.

आयसीसीवर अख्तरची टीका-

पाकिस्तानचा रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या अख्तरने (Shoaib Akhtar) आयसीसीवर टीका केली आहे. ईएसपीएन क्रिकइंफोवर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्याबरोबर चर्चा करताना अख्तरने आयसीसीच्या वनडे क्रिकेटमधील नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे. ज्यामुळे हे फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरले आहे.

मांजरेकरांनी अख्तरला विचारले होते की, मर्यादित क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज धीमे झाले आहेत आणि फिरकीपटू गोलंदाज वेगवान गोलंदाजी करत आहेत, यावर तुमचे काय मत आहे? अख्तरने प्रत्युत्तर देत म्हटले की, “मी स्पष्टपणे बोलतो की आयसीसी क्रिकेट नष्ट करत आहे. मी जाहिरपणे सांगत आहे की, मागील १० वर्षांमध्ये आयसीसीने (ICC) क्रिकेटला उद्ध्वस्त केले आहे. खूप छान, जसा विचार केला होता तसेच तुम्ही केले.”

त्याचे असे मत आहे की, प्रत्येक षटकात ऊसळी चेंडूंची संख्या वाढवली पाहिजे. कारण आता नवीन २ चेंडू आहेत आणि सर्कलच्या बाहेक अधिकवेळा ४ क्षेत्ररक्षक असतात.

ट्रेंडिंग घडामोडी-

-युवराजबरोबर क्रिकेट खेळलेले ‘ते’ ७ खेळाडू, जे फारसे कुणाला नाही आता माहित

-लॉकडाऊनमध्ये कोच रवी शास्त्री यांची शमीकडे ‘अजब’ मागणी

-आफ्रिदीचे आणखी एक मोठं विधान; म्हणतो, हरभजन आणि युवराज…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---