भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या आयुष्यात गेल्या ५ महिन्यांपासून बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने त्याच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ च्या फरकाने गमावली. त्यानंतर १५ जानेवारीला अचानक त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार (Virat Kohli Step Down As Test Captaincy) होणार असल्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यापूर्वीच विराटने टी२० विश्वचषकानंतर स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते. तर त्यानंतर त्याच्याकडून वनडे संघाची कमानही काढून घेण्यात आली होती.
यानंतर क्रिकेटविश्वातून विराटबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानच्या माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने या मुद्द्यावर आपल्या भावना मांडल्या आहेत.
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने म्हटले (Shoaib Akhtar On Virat Kohli) आहे की, विराटने स्वत:हून कर्णधारपद सोडलेले नाही, तर त्याला नेतृत्त्व सोडण्यासाठी भाग पाडले गेले आहे. विराट एक महान क्रिकेटपटू आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रतिभा आहे. पण सहसा मोठी संकटे मोठ्या माणसांवरच येतात. त्यामुळे मी त्याच्यासाठी दुखी आहे. विराटने या परिस्थितीतून बाहेर पडायला पाहिजे. त्याच्यासोबत जे काही घडले आहे, त्याला विसरून त्याने पुढे जायला हवे.
तसेच ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरने भारतीय संघाच्या भावी कर्णधाराविषयीही प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआय भारतीय संघाच्या भविष्यासंदर्भात जो काही निर्णय घेईल तो योग्यच असेल, असे त्याचे म्हणणे आहे.
राहुल द्रविडविषयी अख्तरने दिली प्रतिक्रिया
याखेरीज भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी अख्तर बोलला आहे. दक्षिण आफ्रिकेत द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने निशाराजनक प्रदर्शन केले आहे. तरीही अख्तरने द्रविडची बाजू घेत म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट कधीही खाली ढासळू शकत नाही. त्यांना स्थिती सांभाळावी लागणार आहे. राहुल द्रविडसमोर सध्या खूप मोठे आव्हान आहे. अपेक्षा करतो की, लोक असे म्हणणार नाहीत की, द्रविडला अतिशयोक्ती करत प्रशिक्षकाच्या रूपात समोर आणले गेले. त्याने रवी शास्त्रीची जागा घेणे साहजिक होते, पण भारतीय संघाचे प्रशिक्षकपद त्याच्यापुढील मोठे आव्हान असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीने केली वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला टी२० खेळाडूंची घोषणा; घ्या जाणून कोण आहेत मानकरी
रडू की हसू…! एकाच चेंडूवर २ वेळा गेली विकेट, विचित्र पद्धतीने रनआऊट झाला आंद्रे रसेल
हेही पाहा-