भारतीय संघाचा आणि आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळातून जात आहे. आयपीएल २०२२ मध्येही तो अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करू शकलेला नाहीये. त्याच्या खराब फॉर्ममुळे क्रिकेटचे जाणकार आणि माजी खेळाडू वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रविवारी (८ मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट पुन्हा एकदा शुन्यावर बाद झाला. अशात त्याला सल्ला देणाऱ्यांच्या यादीत शोएब अख्तरच्या रूपात अजून एका दिग्गजाचे नाव सामील झाले.
विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. त्याने खूप कमी वयाlत दिग्गजांचे अनेक विक्रम मोडले आहेत. सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला दावेदार मानले जात होते, पण मागच्या दोन वर्षातील त्याचे प्रदर्शन पाहता, ही गोष्ट आता सोपी वाटत नाही. मागच्या दोन वर्षात विराट एकही शतक करू शकला नाहीये. विराटला सल्ला देणाऱ्यांची यादी मोठी आहे. आता या यादीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) नव्याने सहभागी झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अख्तर एका वृत्तसंस्थेशी बोलताना विराटच्या फॉर्मविषयी देखील व्यक्त झाला. तो म्हणाला की, “विराट कोहली एक महान खेळाडू आहे. त्याला काही सिद्ध करण्याची गरज नाहीये. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये जे केले आहे, तो तेच पुन्हा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच त्याचा फॉर्म खराब झाला आहे. त्याला मैदानात जाऊन फक्त खेळाचा आनंद घेण्याची गरज आहे. तो धावांसाठी खूप जास्त प्रयत्न करत आहे. तो विचार करत आहे की, मी विराट कोहली आहे आणि मला ते करता येत नाहीये, जे मी आधी करायचो.”
दरम्यान, रविवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट जेव्हा शून्यावर बाद झाला, तेव्हा ही हंगामातील तिसरी वेळ होती, जेव्हा तो खाते खोलू शकला नाही. आयपीएल २०२२मध्ये त्याने १२ डावांमध्ये १९च्या सरासरीने २१६ धावा उभ्या केल्या आहेते. त्याचा हा फॉर्म भारतीय संघासाठी देखील चिंतेचा विषय आहे. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे आणि त्यापूर्वी विराटला सूर गवसणे गरजेचे असणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून वेंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते’, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने सांगितले कारण
पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादवला मोठा फटका, तर चहलला आव्हान देणार ‘हा’ गोलंदाज