---Advertisement---

फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारा अख्तर वापरतोय ‘कुबड्या’, वाचा कशामुळे आली ही वेळ

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 3:46 PM
Shaoib-Akhtar
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या अडचणीतून जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती खूपच खराब झाली होती आणि त्यांनी आपल्या चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितले. आता शोएबने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो क्रॅचच्या मदतीने उभा असल्याचे दिसत आहे.

एकेकाळी जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला पाकिस्तानचा शोएब अख्तर आज आपल्या पायावर उभा राहिल्याने त्याचे कौतुक करावे लागत आहे. या दिग्गज खेळडूच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अत्यंत कठीण आणि वेदनादायक शस्त्रक्रियेनंतर त्याने आपली स्थिती सर्व चाहत्यांसोबत शेअर केली. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परततानाचा एक फोटो शेअर केला आहे.

अख्तरने गुरुवारी (१४ ऑगस्ट) त्याच्या दोन मित्रांसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो क्रॅचवर उभा दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आता घरी परतण्याची वेळ आली आहे. माझे भाऊ कमल आणि असद यांचे खूप खूप आभार, त्यांनी माझी खूप काळजी घेतली. माझी मेलबर्नची भेट खूप अविस्मरणीय होती, आम्ही नक्कीच लवकरच पुन्हा भेटू.”

अख्तरने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी प्रार्थना करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. ज्या मध्ये चाहत्यांनी अख्तर लवकरात लवकर बरा व्हावा अशी देवाजवळ प्रार्थना केली असल्याचे दिसून येत आहे. शोएब अख्तर हा नेहमी चर्चेत असणारा चेहरा असतो. त्याच्या क्रिकेट कार्किर्दीत तो त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत असायचा तर आजकाल तो त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असल्याचे पाहायला मिळत असते. आता येत्या २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या रणांगणात भिडणार आहेत. अशा परिस्थितीत अख्तरने फिट होऊन चाहत्यांसोबत या सामन्याचा आनंद घ्यावा असेही अनेकांना वाटत आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

झिम्बाब्वेच्या गोपिकांना भारताच्या कन्हैयाची भुरळ! चाहरचा महिला चाहतींसोबतचा व्हिडिओ व्हायरल

भारताच्या वर्ल्डकप विजयाचा नायक करतोय पुनरागमन! स्वत:च चाहत्यांना दिली खूशखबर

भारताच्या दौऱ्यामुळे झिम्बाब्वे बोर्डाची चांदी, ३ वनडे सामन्यांतून कमावणार ‘इतके’ कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---