नवी दिल्ली । पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे लोकांना आश्चर्यचकीत करत असतो. अशाच प्रकारे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अख्तरने भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल सर्वांना आश्चर्यचकीत करणारे विधान केले आहे.
अख्तर म्हणाला की, २००३च्या विश्वचषकात (2003 World Cup) सचिन (Sachin Tendulkar) बाद झाल्याने मला खूप दु:ख झाले होते. कारण सचिन ९८ धावांवर बाद झाला होता. तो आपले शतक करण्यापासून केवळ २ धावांनी हुकला होता.
सचिनला बाद केल्यानंतर अख्तरला झाले दु:ख-
हॅलो ऍपला दिलेल्या खास मुलाखतीत अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला की, “मी खूप दु:खी झालो होतो. कारण सचिन ९८ धावांवर फलंदाजी करताना बाद झाला होता. ती एक खूपच विशेष खेळी होती. त्याने शतक करायला पाहिजे होते. मला वाटत होते की, त्याने आपले शतक पूर्ण करावे. त्या बाऊंसर चेंडूवर त्याने षटकार लावला असता तर मला नक्कीच आनंद झाला असता. ज्याप्रकारे त्याने आधीच्या सामन्यांमध्ये केले होते.”
सचिनने त्या सामन्यात ७५ चेंडूत ९८ धावांची खेळी केली होती. भारतीय संघाने त्यावेळी २७४ धावांचे आव्हान सहजरित्या ४ विकेट्स गमावून पूर्ण केले होते. तसेच भारतीय संघाने तो सामना जिंकला होता. सचिनच्या या खेळीला त्याच्या कारकीर्दीतील सर्वात खास खेळी म्हटले गेल होते. सचिनने जरी वनडेत ५१ शतके ठोकली आहेत. परंतु पाकिस्तानविरुद्ध २००३मध्ये केलेल्या ९८ धावा त्याच्या कारकीर्दीतील सर्वात खास होत्या.
अख्तर त्या साामन्यात महागडा ठरला होता. महागडा यासाठी की त्याने सर्वाधिक ७२ धावा दिल्या होत्या.
सचिन-विराट ची तुलना होऊ शतक नाही-
अख्तरने सचिनची प्रशंसा करत म्हटले की, सचिनने सर्वात कठीण काळामध्ये आपली क्रिकेट कारकीर्द उत्तमरित्या घडवली. अख्तरने दावा केला की, जर यावेळी सचिन खेळत असता, तर त्याने नक्कीच १.३० लाखपेक्षा अधिक धावा केल्या असत्या. अख्तर म्हणाला की, त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि सचिनची तुलना नकोच.
सचिनने आतापर्यंत २०० कसोटी सामने, ४६३ वनडे सामने आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. त्यात त्याने कसोटीत १५,९२१, वनडेत १८४२६ आणि टी२०त केवळ १० धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-विराटही दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन जेवणं करुन धरायचा घरचा रस्ता
-विराटला चोरी करायची होती मास्टर ब्लास्टरची ही गोष्ट, पण
-वनडे सामन्यांमध्ये ‘हॅट्रिक’ घेणार भारताचे ४ दिग्गज गोलंदाज