---Advertisement---

पत्नी सानियाने केले चीयर, मग काय शोएबने पाकिस्तानसाठी ठोकले सर्वात वेगवान टी२० अर्धशतक- VIDEO

On: सोमवार, नोव्हेंबर 8, 2021 11:38 AM
---Advertisement---

पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. सलग ४ सामने जिंकत पाकिस्तान संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला होता. तसेच रविवारी (७ नोव्हेंबर) पाकिस्तान संघाचा सामना स्कॉटलॅंड संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने ७२ धावांनी जोरदार विजय मिळवला. या विजयात पाकिस्तान संघाकडून मोलाचे योगदान देणाऱ्या शोएब मलिकने भारतीय फलंदाज केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

शोएब मलिकने स्कॉटलॅंड संघाविरुद्ध फलंदाजी करताना शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अर्धशतक झळकावल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेली सानिया मिर्झा देखील भलतीच खुश झाली होती. या खेळीसह शोएब मलिकने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावण्याचा बाबतीत केएल राहुलची बरोबरी केली आहे. केएल राहुलने देखील स्कॉटलॅंड संघाविरुद्ध फलंदाजी करताना १८ चेंडूंमध्ये तुफानी अर्धशतक झळकावले होते.

तर युवराज सिंगने २००७ मध्ये केलेला विक्रम अजूनही कोणी मोडू शकलेलं नाहीये. युवराज सिंगने २००७ मध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अवघ्या १२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

https://www.instagram.com/reel/CV-vrc6FT_Y/?utm_source=ig_web_button_share_sheet

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज 
१२ चेंडू – युवराज सिंग,२००७
१७ चेंडू – स्टीफन मायबर्ग, २०१४
१८ चेंडू – ग्लेन मॅक्सवेल ,२०१४
१८ चेंडू – केएल राहुल, २०२१
१८ चेंडू – शोएब मलिक, २०२१*

तसेच शोएब मलिक पाकिस्तान संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तान संघासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम उमर अकमलच्या नावे होता. उमर अकमलने हा कारनामा २१ चेंडूंमध्ये केला होता. तर आता शोएब मलिक या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे.

पाकिस्तान संघासाठी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज 
१८ चेंडू – शोएब मलिक*
२१ चेंडू – उमर अकमल
२२ चेंडू – उमर अकमल

विशेष म्हणजे, शोएबच्या संपूर्ण खेळीदरम्यान त्याची पत्नी आणि प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा स्टेडियममध्ये उपस्थित होती. ती स्टेडियममधून त्याला चीयर करत त्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसली. त्यामुळे अनेकांनी तिला मलिकच्या या खेळीसाठी लकी फॅक्टर समजले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोहली, शास्त्री अन् आयसीसी ट्रॉफी, एक न सुटणारं गणित; सलग तिसऱ्या टूर्नामेंटमध्ये झालीय निराशा

अफगाणिस्तानच्या पराभवाने ‘विराट ब्रिगेड’चे तुटले काळीज, नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी घेतला ‘मोठा’ निर्णय

इंग्लंडविरुद्ध ९४ धावा चोपणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाची कार्तिकला पडली भुरळ, उधळली स्तुतीसुमने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---