पाकिस्तान क्रिकेट संघाचे अनुभवी खेळाडू शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, वहाब रियाज आणि मोहम्मद आमिर यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केंद्रीय करारात स्थान दिले नव्हते. त्यामुळे या चारही खेळाडूंना क श्रेणीतील खेळाडूंना मिळणारे सामना शुल्क देण्यात येत होते. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना देण्यात येणाऱ्या सामना शुल्काबद्दक एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
या चारही खेळाडूंनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांना सांगितले होते की, केंद्रीय करारात स्थान न मिळाल्यानंतरही त्यांच्यावर अन्याय केला जात आहे आणि त्यांना वरिष्ठ खेळाडूंना मिळणारे उच्च श्रेणीचे सामना शुल्क देण्यात आले नाही.
यापूर्वी केंद्रीय करारात समावेश न केल्यामुळे त्यांना क श्रेणीतील खेळाडूंना मिळणारे सामना शुल्क देण्यात येत होते, ज्यात वनडे सामन्यांसाठी सुमारे 2,02,000 रुपये (पाकिस्तानी चलनानुसार) आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी यापेक्षा कमी रक्कम मिळत होती.
आता त्यांना अ श्रेणीतील खेळाडूंना मिळणारे सामना शुल्क दिले जाईल. ज्यामध्ये वनडे सामन्यासाठी 4,60,000 रुपये आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 3,30,000 रुपये सामना शुल्काची तरतूद आहे.
याबरोबरच राष्ट्रीय संघात असल्याने विदेशी टी20 लीगमध्ये भाग घेऊ न शकल्याबद्दल खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. खेळाडूंची ही मागणी बोर्डाने फेटाळून लावली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने म्हटले की “ते यासाठी कोणतीही नुकसान भरपाई देऊ शकत नाही आणि खेळाडूंनी राष्ट्रीय संघातील कर्तव्याला प्राधान्य द्यावे.”
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाल्यानंतर पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिजला श्रीलंका प्रीमियर लीगमधून माघार घ्यावी लागली, त्यामुळे त्याचे जवळपास 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले. न्यूझीलंड दौर्यावर उशिरा संघात रुजू होण्याची त्याची विनंतीही बोर्डाने फेटाळून लावली.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाज झाले यशस्वी, मोहम्मद शमीचा खुलासा
वडिलांच्या निधनानंतर सिराजने ‘हा’ कठोर निर्णय घेत नाकारला बीसीसीआने दिलेला पर्याय
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात