पाकिस्तानचा वरीष्ठ खेळाडू शोएब मलिक सध्या संघाबाहेर आहे. त्याला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळत नाहीये. आशिया चषक 2022मध्ये पाकिस्तानची फलंदाजीत मधली फळी कमकुवत दिसत होती. मात्र, तरीही त्याला टी20 विश्वचषकात संघात स्थान मिळाले नाही. शोएब मलिकसाठी संघाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. संघाचे दरवाजे ज्यावेळी एखाद्या खेळाडूसाठी बंद होतात तेव्हा बरेच खेळाडू निवृत्ती घेताना दिसतात. मात्र, शोएब मलिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केलेला नाही.
माध्यमांशी बोलताना शोएब मलिक (Shoaib Malik) म्हणाला की, “मला आतल्या गोष्टी माहिती नाहीत, पण बाबर आझम (Babar Azam) मला म्हणाला होता की जो संघ आशिया चषक खेळला तोच संघ टी20 विश्वचषकासाठी जाणार. तो त्याच्या पद्धतीने माझ्याशी संभाषण करत होता आणि आमच्या दोघातील संबंध चांगले आहेत. तो माझ्या छोट्या भावासारखा आहे. जेव्हा कधी बाबरला आपल्या खेळाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी माझी गरज असेल, तेव्हा मी नेहमी त्याच्या मदतीसाठी तत्पर असेल. ”
शोएब पुढे म्हणाला की, “माझ्या प्रार्थना नेहमी त्याच्या सोबत असतील आणि मला त्याला नेहमी पुढे जाताना बघायचे आहे. मला बाबरला आणि पाकिस्तान संघाला नेहमी टॉपवर बघायचे आहे.” त्याचबरोबर तो आपल्या निवृत्तीबद्दल म्हणाला की, “मी सध्या निवृत्तीबद्दल विचार करत नाहीये. जर मी निवृत्ती घेतली तर याचा प्रभाव माझ्या लीग क्रिकेटवरही पडेल.” शोएब मलिक जगभातील अनेक लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो.
सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर तीन कसोटी सामने खेळवले जाणार आहेेत. या मालिकेेतील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळवला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला. आता दुसरा सामना मुलतान या ठिकाणी खेळवला जात आहे. जर हा सामना इंग्लंडने जिंकला तर मालिकाही जिंकेल.(Shoaib Malik said he will not retire because it will affect his performance in league cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय संघात मोठे बदल; रोहितची घरवापसी तर ‘हा’ खेळाडू असेल कर्णधार
बाबो केवढा तो कॉन्फिडन्स! ‘मी न खेळता डाव घोषीत करेल’, बेन स्टोक्सचे खळबळजनक विधान