---Advertisement---

“नेपाळचा संघही त्याला आपल्या टीममध्ये स्थान देणार नाही”, शोएब मलिकनं केला बाबर आझमचा अपमान

On: मंगळवार, जुलै 2, 2024 5:54 PM
Babar Azam
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वाईट काळ काही संपत नाहीये. संघाच्या कामगिरीत सातत्यानं घसरण होत आहे. 2024 टी20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी खूपच सरासरी राहिली. संघ अमेरिका आणि भारताविरुद्ध पराभूत होऊन ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला.

पाकिस्तानच्या या पराभवानंतर संघाचा कर्णधार बाबर आझमवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशाचे अनेक माजी खेळाडू बाबर आझमवर टीका करत आहेत. या टीकेदरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकनं एक पाऊल पुढे जात चक्क बाबर आझमचा अपमानच केला.

शोएब मलिकचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शोएब टी20 विश्वचषकाबद्दल बोलताना दिसत आहे. या दरम्यान त्यानं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर जोरदार हल्ला चढवला. शोएब म्हणाला, “आपला सर्वोत्तम खेळाडू कोण? आपला सर्वोत्तम खेळाडू बाबर आझम आहे. मी जागतिक क्रिकेटमधील अव्वल 4-5 संघांबद्दल बोलत आहे. बाबर त्यांच्या संघात फिट होऊ शकतो का? बाबर या संघांच्या प्लेइंग 11 मध्ये खेळू शकतो का? तो ऑस्ट्रेलियन संघात, इंग्लंड संघात किंवा भारतीय संघात फिट होऊ शकतो का? विशेषतः टी20 फॉरमॅटमध्ये. तर याचं उत्तर नाही असं आहे. खरं तर नेपाळचा संघही बाबर आझमला आपल्या संघात स्थान देणार नाही.”

 

बाबर आझमसाठी कर्णधार आणि फलंदाज म्हणून 2024 टी20 विश्वचषक खूपच सरासरीचा राहिला. बाबरनं विश्वचषकाच्या 4 सामन्यात 101.66 च्या साधारण स्ट्राईक रेटनं 122 धावा केल्या. त्याला विश्वचषकात एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या स्ट्राईक रेटवरही सातत्यानं टीका झाली.

फलंदाजीशिवाय बाबर आझमच्या नेतृत्व गुणांवरही टीका होते आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेसारख्या नवख्या संघाकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर पाकिस्तानला कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध 120 धावांचं माफक लक्ष्य गाठता आलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेम्स अँडरसन निवृत्तीनंतरही इंग्लंड संघासोबतच राहणार, मिळणार मोठी जबाबदारी
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळपट्टीची माती का चाखली? रोहित शर्मानं स्वत: केला खुलासा
भारतीय संघानंतर राहुल द्रविड आता आयपीएलमध्ये कोचिंग सांभाळतील? आरसीबीसह या 3 टीम आहेत शर्यतीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---