---Advertisement---

दिग्गज कॅप्टनने तडकाफडकी केली निवृत्तीची घोषणा, अचानक घेतलेल्या निर्णयाने क्रिकेटविश्वाला धक्का

Breaking
---Advertisement---

क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिने हैराण करणारा निर्णय घेत निवृत्तीची घोषणा केली आहे. मेग लॅनिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली आहे. मेगने दोन वेळा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा किताब संघाला जिंकून दिला आहे. याव्यतिरिक्त तिने पाच वेळा महिला टी20 विश्वचषकाचाही किताब जिंकला होता. सर्व क्रिकेट प्रकारात मिळून तिने ऑस्ट्रेलियासाठी 8 हजारांहून अधिक धावा केल्या. आता 31 वर्षांच्या वयात तिने या खेळाला रामराम ठोकला आहे. मेग लॅनिंग सध्या महिला बिग बॅश लीग स्पर्धेत खेळत आहे.

काय म्हणाली मेग?
मेग लॅनिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त (Meg Lanning Retires From International Cricket) होण्याविषयी व्यक्त झाली आहे. तिने म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेणे खूपच कठीण राहिला, पण मला वाटले की, हीच योग्य वेळ आहे. मी खूपच भाग्यवान आहे की, 13 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाला. मात्र, आता मला माझ्या हिशोबाने काही नवीन गोष्टी करण्याची ही योग्य वेळ आहे. तुम्ही संघाच्या यशासाठी खेळता. मी माझ्या कारकीर्दीत जे काही मिळवले आहे, त्याचा अभिमान आहे. माझ्या सहकाऱ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी लक्षात ठेवेल. मी माझे कुटुंब, संघाच्या खेळाडू, क्रिकेट व्हिक्टोरिया, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनचे आभार मानू इच्छिते. मी चाहत्यांनाही धन्यवाद देते, ज्यांनी माझ्या कारकीर्दीदरम्यान मला भरपूर पाठिंबा दिला.”

मेगची कामगिरी
मेग लॅनिंग हिच्याविषयी बोलायचं झालं, तर तिने 2012मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा टी20 विश्वचषकाचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने भारतात वनडे विश्वचषक जिंकला होता. तिने 2014मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. मेग एकूण 7 विश्वचषक किताब जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची सदस्य होती. त्यातील एकूण 5 विश्वचषक किताब हे तिने कर्णधार म्हणून जिंकले आहेत. त्यात टी20चे 4 (2014, 2018, 2020, 2023) आणि विश्वचषकाच्या एक (2022) किताबाचा समावेश आहे.

मेगची कारकीर्द
मेगने 13 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत एकूण 241 सामने खेळले. त्यातील 182 सामन्यात ती कर्णधार म्हणून खेळली. यादरम्यान तिच्या बॅटमधून एकूण 8352 धावाही निघाल्या. मेगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 17 शतकांचाही पाऊस पाडला आहे. (shocking australia captain meg lanning announced her retirement from international cricket)

हेही वाचा-
“शाकिबला दगडाने मारू”, Time Out विकेटनंतर मॅथ्यूजच्या भावाचे धक्कादायक विधान, वाचा सविस्तर
अखेर इंग्लंडने पाहिला CWC 2023 मध्ये दुसरा विजय! नेदरलँड्सचा दारूण पराभव, स्टोक्स ठरला नायक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---