---Advertisement---

विराट ब्रिगेडवर कोरोनाचं संकट, तरीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 7:55 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली होती. ही सुट्टी भारतीय खेळाडूंना खूप महागात पडली आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच येत्या काही दिवसात भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष हॅरिसन यांनी म्हटले की, “भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान बायो बबल अधिक कठोर बनवण्यात येणार नाही.”

भारतीय क्रिकेटपुर्वी इंग्लंड क्रिकेट संघातील खेळाडूंना देखील कोरोनाची लागण झाली होती. इंग्लंडच्या एकूण ७ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत इंग्लंड संघाला नवीन संघाची निवड करावी लागली होती.(Shocking decision of ECB after rishabh pant test corona positive)

इंग्लंडमध्ये बुधवारी (१४ जुलै) ४२ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तरीदेखील इंग्लंड क्रिकेट बोर्ड कसोटी मालिकेसाठी आणि काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कठोर बायो बबल बनवणार नाही. गेल्या वेळेस इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणली होती. परंतु आता असे होणार नाही. खेळाडू हॉटेलच्या बाहेर सराव करू शकतील, आपल्या कुटुंबासह वेळही घालवू शकतील.

तसेच हॅरिसन यांनी म्हटले की, “आपण सर्वजण कोरोनाच्या संकटातही सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत. ही रणनिती खतरनाक आहे. परंतु आपण खेळाडूंच्या मानसिकतेसोबत छेडछाड करू शकत नाही.” बायो बबलमध्ये राहणाऱ्या खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. काही खेळाडूंनी बायो बबलला घाबरून आयपीएल स्पर्धेत देखील सहभाग घेतला नव्हता.

रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली असली तरी देखील भारतीय संघाच्या वेळापत्रकात कुठलाही बदल झालेला नाही. येत्या २० जुलैला भारतीय संघ डरहॅममध्ये सराव सामना खेळणार आहे. रिषभ पंत सह वृद्धिमान साहाला देखील विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. याचे कारण असे की तो थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांच्या संपर्कात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव! थ्रोडाऊन स्पेशालिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने २ खेळाडूंसह गोलंदाजी प्रशिक्षक क्वारंटाईन

चर्चा तर होणारच! भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने चाहत्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

‘मी फक्त सांगतोय!’ भारताचे दोन्ही यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये असल्याने दिनेश कार्तिकने पुढे केला मदतीचा हात?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---