इंग्लंड क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान दौरा संपवून मायदेशी परतलेला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या घरी चोरी झाली आहे. बेन स्टोक्सने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे हा मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, जेव्हा तो इंग्लंड संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर होता, तेव्हा चोरट्यांनी त्याच्या घरातून दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्या. ही घटना 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान मुल्तानमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडली.
बेन स्टोक्सने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, गुरुवार 17 ऑक्टोबरच्या संध्याकाळी, काही मुखवटा घातलेल्या चोरांनी उत्तर-पूर्वेकडील कॅसल ईडन भागात असलेल्या त्याच्या घरात चोरी केली. चोरट्यांनी त्याच्या घरातून दागिने, इतर मौल्यवान वस्तू आणि अनेक वैयक्तिक वस्तू पळवून नेल्या. त्यांनी स्पष्ट केले की यापैकी बऱ्याच वस्तूंचे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी भावनिक महत्त्व आहे. ज्यांनी ही चोरी केली त्यांना शोधण्यासाठी सर्वांनी मदत करावी. असे आवाहनही त्यानी केले.
स्टोक्स म्हणाला की, या गुन्ह्याची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे माझी पत्नी आणि दोन लहान मुले घरी असताना हा गुन्हा घडला. सुदैवाने, माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला शारीरिक इजा झाली नाही. मात्र यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. स्टोक्सने चोरीच्या काही वस्तूंचे फोटो पोस्ट केले आहेत जेणेकरून ते सहज ओळखता येतील.
View this post on Instagram
बेन स्टोक्सने लोकांना आवाहन केले की या चोरीशी संबंधित कोणाकडे काही माहिती असल्यास कृपया पुढे या आणि डरहम कॉन्स्टेब्युलरशी संपर्क साधा. शेवटी त्याने पोलिसांचे आभार मानले आणि सांगितले की, जेव्हा तो पाकिस्तानमध्ये होता तेव्हा पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला खूप मदत केली.
हेही वाचा-
IND vs NZ; रोहित-विराटच्या खराब फाॅर्मबद्दल प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य! म्हणाले…
4 महिन्यातच दिग्गजाने दिला राजीनामा, भारतीय खेळाडूची भविष्यवाणाी ठरली खरी!
आरसीबीच्या संघात ‘या’ विस्फोटक खेळाडूची एँट्री