---Advertisement---

‘देशाला धर्माच्या नावावर वाटू नका’, गोव्यात दुकानदाराचा पाकिस्तान संघाला पाठिंबा, लोकांनी दिली ‘ही’ शिक्षा

On: शनिवार, फेब्रुवारी 25, 2023 5:28 PM
Goa-Pakistan-Cheer
---Advertisement---

गोव्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीला पाकिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा देणे महागात पडले आहे. पाकिस्तानचे समर्थन केल्यामुळे त्या व्यक्तीकडून इतर लोकांनी गुडघ्यावर बसून माफी मागायला लावली आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्याला ‘भारत माता की जय’च्या घोषणाही द्यायला लावल्या. उत्तर गोवा भागातील कैलंगुट येथील हे प्रकरण आहे. एका प्रवासी ब्लॉगरने त्या व्यक्तीचा व्हिडिओ आपल्या ब्लॉगसह सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल्यानंतर हे प्रकरण इतरांच्या लक्षात आले. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
एक प्रवासी ब्लॉगर कैलंगुट (Calangute) येथील परिसरात फिरताना व्हिडिओ शूट करत होता. तिथे एका दुकानावर पोहोचला, तेव्हा तिथे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) संघात सामना सुरू होता. ब्लॉगरने दुकानदाराला विचारले की, “कोण खेळत आहे? तुम्ही न्यूझीलंडला चीअर करत आहात का?” यावर दुकानदाराने उत्तर दिले की, “मी पाकिस्तानला चीअर करत आहे.” यानंतर ब्लॉगरने पुन्हा प्रश्न केला की, “तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा का देत आहात?” या प्रश्नावर दुकानदाराने उत्तर दिले की, “कारण हा मुस्लिम परिसर आहे.” यानंतर जवळपासचे लोक म्हणाले की, “इथे कोणतीही मुस्लिम गल्ली नाहीये.”

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांचा एक ग्रूप दुकानदाराजवळ पोहोचला. त्यातील एकाने म्हटले की, “हे संपूर्ण गाव कैलंगुट आहे. इथे कोणतीही मुस्लिम गल्ली नाहीये. देशाला धर्माच्या आधारावर वाटू नका. यानंतर त्या लोकांनी त्या व्यक्तीला गुडघे टेकण्यास आणि देशाच्या नागरिकांची माफी मागण्यास सांगितले.”

दुकानदाराने कान पकडून मागितली माफी
या व्हिडिओत दिसते की, दुकानदारने गुडघ्यावर बसून आणि कान पकडून माफी मागितली. यादरम्यान तो हात जोडून म्हणतो की, “आता अशी चूक होणार नाही.” त्यानंतर तिथे उपस्थित लोक त्याच्याकडून भारत माता की जयच्या घोषणा द्यायला लावतात. स्थानिक लोकांच्यानुसार, त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नाहीये. (shocking pakistan vs nz match video goa man forced to chant bharat mata ki jai video viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धोनी माझा फोन 99% उचलणारच नाही’, विराटचा मोठा खुलासा
सर्व बाजूंनी टीका होत असताना हरमनप्रीतला मिळाला अनुष्काचा पाठिंबा; म्हणाली, ‘तुझा आणि तुझ्या संघाचा…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---