Complaint filed against Mitchell Marsh: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत करत जिंकला होता. किताब जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवून बसल्याचा फोटो सोशल मीडियावर आगीसारखा पसरला. यानंतर त्याच्यावर जगभरातून टीका होत आहे. अशात हाती आलेल्या माहितीनुसार, मिचेल मार्शविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे. भ्रष्टाचार विरोधी सेनेचे अध्यक्ष पंडित केशव देव यांनी 21 नोव्हेंबर रोजी अलीगडच्या दिल्ली गेट ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती.
जिल्हा पोलीसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “तक्रार आली आहे, पण अद्याप गुन्हा दाखल झाला नाहीये. तसेच, सायबर सेलकडून अहवाल आल्यानंतर कारवाईला सुरुवात केली जाईल.”
काय म्हणाले पोलीस अधीक्षक?
पोलीस अधीक्षक मृगांक शेखर यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याच्याविरुद्ध अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये. तक्रारदाराने म्हटले होते की, “देशाच्या पंतप्रधानांनी विजेत्या संघाला सोपवलेल्या ट्रॉफीचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने अनादर करत भारतीय लोकांचा अपमान केला आहे.”
ऑस्ट्रेलियाच्या नावे सहावा विश्वचषक
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) संघात अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले, तर फलंदाजी करताना ट्रेविस हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचा धक्का देत सलग नवव्या विजयासह सहावा विश्वचषकही नावावर केला होता.
सलग 10 सामने जिंकत अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत तिसरा विश्वचषक जिंकण्याची आशा होती. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) आणि आर अश्विन (R Ashwin) यांनी वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा दुसऱ्यांदा भाग बनण्याचे स्वप्न पाहिले होते. तसेच, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही पहिल्यांदा विश्वचषक विजेता बनण्याचे स्वप्न पाहिले होते, पण पॅट कमिन्स याच्या संघाने हे स्वप्न धुळीस मिळवले. (shocking police complaint against mitchell marsh for disrespecting cricket world cup 2023 trophy)
हेही वाचा-
Mitchell Marsh WC Trophy Controversy: मार्शच्या ‘त्या’ कृत्यावर शमीनेही काढला राग; म्हणाला, ‘ज्यासाठी संघ…’
“त्याला शिकवण्याची गरज नाही”, रोहितला लक्ष्य करणाऱ्यांवर अश्विन संतापला