क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणजेच वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी सर्व संघांना आपला अंतिम संघ जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती. अशात भारतीय संघाने तर विश्वचषकासाठी आपला सदस्यीय संघही घोषित केला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका संघानेही या स्पर्धेसाठी आपला संघ घोषित केला. मात्र, अशातच दक्षिण आफ्रिकेसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीकडून याची पुष्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका संघानेही सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे.
🟡ANNOUNCEMENT 🟢
Quinton de Kock has announced his retirement from ODI cricket following the conclusion of the ICC @cricketworldcup in India 🏆 🏏
What's your favourite Quinny moment throughout the years ? 🤔 pic.twitter.com/oyR6yV5YFZ
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 5, 2023
कधी होणार निवृत्त?
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मॅगझीन माहिती दिली आहे की, क्विंटन डी कॉक वनडे विश्वचषकानंतर या क्रिकेट प्रकारातून निवृत्त होणार आहे. मॅगझीनने दक्षिण आफ्रिकेचे संचालक ऍनॉक एनक्वे यांच्या हवाल्याने लिहिले की, “वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा त्याचा निर्णय आम्ही समजू शकतो. आम्ही वर्षोनुवर्षे दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये योगदान दिल्याबद्दल त्याला धन्यवाद देतो. आम्ही त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो आणि टी20 क्रिकेटमध्ये तो अजूनही दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाची सेवा करत राहील.”
विशेष म्हणजे, डी कॉकने डिसेंबर 2021मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या वनडे विश्वचषक संघाची घोषणा
दक्षिण आफ्रिकेच्या वनडे विश्वचषक संघाची मंगळवारी घोषणा झाली. या संघात डी कॉक याच्या नावाचा समावेश आहे. हा त्याचा अखेरचा वनडे विश्वचषक असणार आहे. डी कॉकने 2013मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले होते. हा त्याचा तिसरा आणि अखेरचा वनडे विश्वचषक असेल. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत एकूण 140 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 44.85च्या सरासरीने 5966 धावा केल्या आहेत. यादरम्यान 178 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे. ही धावसंख्या त्याने 2016मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरियन येथे उभारली होती.
वनडे विश्वचषक 2023साठी दक्षिण आफ्रिका संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेन्रीच क्लासेन, सिसांडा मगाला, केशव महाराज, एडेन मार्करम, लुंगी एन्गिडी, डेविड मिलर, एन्रीच नॉर्किया, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वॅन दर दुसेन, जेराल्ड कोएट्जी. (shocking quinton de kock set to retire from one day international cricket after odi world cup 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचे ‘हे’ 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वनडे वर्ल्डकप, यादीत स्टार क्रिकेटर्सचा समावेश; पाहा यादी
धवनसह ‘या’ 4 खेळाडूंना नाही मिळाली संघात संधी, विश्वचषकातून पडले बाहेर