सध्या विश्वचषक 2023 स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 2 नोव्हेंबर रोजी स्पर्धेच्या 33व्या सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत केले होते. हा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा विजय ठरला. मात्र, या पराभवानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डमध्ये खळबळ माजली आहे. कारण, विश्वचषकापूर्वी आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारताने श्रीलंकेला 51 धावांवर सर्वबाद केले होते आणि आता 55 धावांवर बाद केले होते.
श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
श्रीलंकेच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे (Roshan Ranasinghe) यांनी सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) मोठे पाऊल उचलले. रणसिंगे यानी भ्रष्टाचार आरोपांबाबत श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाविरुद्ध बरखास्तीची याचिका दाखल केली आहे. त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड तात्पुरत्या काळासाठी निलंबित केले आहे. रणसिंघे यांच्या कार्यालयाद्वारे जारी केलेल्या एका निवेदनात 1996 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना बोर्डाचे अंतरिम अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. यासोबतच श्रीलंका क्रिकेटसाठी एक अंतरिम समितीही नियुक्त केली गेली आहे.
The entire Sri Lanka Cricket Board has been fired. pic.twitter.com/o10oNzY2Z2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 7, 2023
बोर्डाच्या सचिवाने दिला राजीनामा
नवनियुक्त समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे एक सेवानिवृत्त न्यायाधीश आणि बोर्डाच्या माजी अध्यक्षांचा समावेश आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डावर या कारवाईपूर्वी सचिव मोहन डी सिल्वा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. खरं तर, विश्वचषक 2023 स्पर्धेत फक्त भारताविरुद्धच्या सामन्यातच नाही, तर अधिक संघांविरुद्धही श्रीलंका खराब प्रदर्शन करत आहे.
श्रीलंका संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना फक्त 2 सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच, उर्वरित 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंका संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे.
श्रीलंकेचा उरला एक सामना
श्रीलंका क्रिकेट संघाच्या खराब प्रदर्शनाने देशात खळबळ माजली आहे. खेळाडूंच्या प्रदर्शनासह अधिकाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, कोणालाच कल्पना नव्हती की, यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित (Sri Lanka Cricket Board Suspended) केले जाईल. या स्पर्धेत श्रीलंकेला आणखी एक सामना खेळायचा आहे. हा सामना 9 नोव्हेंबर रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणार आहे. (shocking sri lanka cricket board suspended after sri lanka team poor performance in world cup 2023)
हेही वाचा-
खिलाडूवृत्ती न दाखवणाऱ्या शाकिबने यापूर्वीही केलाय राडा! अंपायरपुढेच स्टम्पला मारली होती लाथ- Video
याला म्हणतात स्पोर्ट्समनशीप! क्रिकेटमधला ‘हा’ अफलातून व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक