जंटलमन्सच्या क्रिकेट खेळात सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) नकोशी घटना घडली. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने होते. श्रीलंकेच्या डावात अँजेलो मॅथ्यूज एकही चेंडू न खेळता तंबूत परतला. यावेळी संधी साधत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने पंचांकडे टाईम आऊटची अपील केल्यामुळे मॅथ्यूजला तंबूचा रस्ता धरावा लागला. त्याच्या या कृतीमुळे खिलाडूवृत्तीवरून त्याच्यावर टीकेची झोड उडाली आहे. अशात एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात खिलाडूवृत्तीचे दर्शन घडते.
आयर्लंड विरुद्ध नेपाळ संघ एका टी20 सामन्यात आमने-सामने असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसते. ही घटना मागील वर्षीची आहे. या सामन्यात खिलाडूवृत्ती (Spirit of Cricket) पाहायला मिळते, जो पाहून प्रत्येकजण सलाम ठोकल्याशिवाय राहणार नाही. नेपाळचा यष्टीरक्षक फलंदाज आसिफ शेख (Aasif Sheikh) याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक झाले होते.
नेमकं काय घडलं?
खरं तर, टी20 सामन्यात आयर्लंड संघाच्या डावातील 19व्या षटकात फलंदाज मार्क अडायर आणि अँडी मॅकब्राईन (Andy McBrine) क्रीजवर होते. नेपाळकडून कमल सिंग गोलंदाजी करत होता. कमलच्या तिसऱ्याच चेंडूवर मार्क अडायरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू आणि बॅटचा नीट संपर्क झाला नाही आणि चेंडू जास्त दूर गेला नाही.
Even Aasif Sheikh from Nepal has a 1000 time better Sportsmanship then Shakib Al Hasan.
Today, Cricket ???? has seen a Dark Day that too in a World Cup Match????Follow ????#BANvsSL #AngeloMatthews #ShakibAlHasan #CWC23 #AngeloMathews #ThugLife #timedout pic.twitter.com/EHL9X3lsW6
— Richard Kettleborough (@RichKettle07) November 6, 2023
यावेळी दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या मॅकब्राईन एकेरी धाव घेण्यासाठी जोरात धावला. यावेळी गोलंदाजही चेंडूच्या दिशेने वेगाने धावला. यावेळी दोघांची टक्कर झाली आणि मॅकब्राईन धडपडून खाली कोसळला. यादरम्यान गोलंदाजाने चेंडू उचलून यष्टीरक्षकाकडे फेकला. यावेळी यष्टीरक्षक आसिफने यादरम्यान खिलाडूवृत्तीचे उदाहरण देत फलंदाजाला धावबाद केले नाही. आसिफच्या या खिलाडूवृत्तीचे (Sportsmanship) जोरदार कौतुकही झाले. आता या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा आसिफवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.
This is brilliant from Nepal wicket-keeper Aasif Sheikh – spirit of cricket moment. pic.twitter.com/704Q85B3gN
— Johns. (@CricCrazyJohns) February 14, 2022
मॅथ्यूज पहिलाच खेळाडू
अँजेलो मॅथ्यूज हा निश्चित वेळेत क्रीजवर पोहोचून चेंडू खेळू न शकल्याने नियमानुसार त्याला तंबूत परतावे लागले. अशाप्रकारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाईम आऊट पद्धतीने बाद होणारा पहिलाच खेळाडू ठरला. (Aasif sheikh refuses to run out andy mcbrine video viral angelo mathews time out shakib al hasan)
हेही वाचा-
सामन्यानंतरही थांबला नाही वाद, हातमिळवणी तर सोडाच, खेळाडूंनी एकमेकांकडे ढुंकूनही पाहिलं नाही- Video
जगात रंगली मॅथ्यूजच्या टाईम आऊटची चर्चा; आता समोर येत चौथ्या अंपायरने केला मोठा खुलासा; म्हणाला…