विश्वचषक 2023 स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेला 38वा सामना कुठल्याही चाहत्याला आठवणीत ठेवू वाटणार नाही. कारण, हा सामनाही विश्वचषकाच्या सर्वात वादग्रस्त सामन्यांमध्ये गणला जाईल. या सामन्यात खिलाडूवृत्तीला ठेच पोहोचल्याचे दिसते. श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याच्या टाईम आऊटपासून सुरू झालेला हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. खेळाडूंमधील बाचाबाची आणि प्रत्येक विकेटनंतर वेगळ्या प्रकारचा जल्लोष, या गोष्टी सामन्यात पाहायला मिळाल्या. जंटलमन्सचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटला गालबोट लागण्याची घटना या सामन्यात घडली. हद्द तर तेव्हा झाली, तेव्हा सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हातमिळवणी केली नाही.
सामन्यानंतर खेळाडूंनी केली नाही हातमिळवणी
डावाच्या 42व्या षटकातील पहिल्या चेंडूवर तंजीम हसन याने अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याच्या गोलंदाजीवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. हा बांगलादेश संघाचा विश्वचषकाच्या इतिहासातील श्रीलंकेविरुद्धचा पहिला विजय होता. सामना संपल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी पंचांशी आणि सामनाधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली, पण ते बांगलादेशच्या डगआऊटकडे गेलेसुद्धा नाहीत. असेच काहीसे बांगलादेशच्या खेळाडूंनीही केले. त्यांनी श्रीलंका संघाच्या खेळाडूंशी हात मिळवणी करण्यात कोणताही रस दाखवला नाही. असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले, जेव्हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हातमिळवणी केली नाही. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/PunjabKingsCult/status/1721587305276969054?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1721587305276969054%7Ctwgr%5Ef81d692a6c35020643c9295d266f66fa27ec5ad4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fheadlines-ban-vs-sl-world-cup-2023-bangladesh-and-sri-lanka-team-players-did-not-shake-hands-after-match-angelo-mathews-shakib-al-hasan-23574843.html
खेळाडूंमध्ये बाचाबाची
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (BAN vs SL) संघातील खेळाडूंमध्ये सामन्यादरम्यान मैदानात बाचाबाची पाहायला मिळाली. मॅथ्यूजने शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला बाद केल्यानंतर हातावरील घड्याळाच्या दिशेने इशारा करत जल्लोष केला. तसेच, कर्णधार कुसल मेंडिस फलंदाजांना बोट दाखवत काहीतरी बोलताना दिसला. बांगलादेशचे फलंदाजही श्रीलंकेच्या खेळाडूंशी मैदानावर भिडताना दिसले. सामन्याच्या शेवटी खेळाडू हातापाईवर उतरण्याची वेळ आली होती.
No handshake between Sl nd Ban players .. #SLvBAN pic.twitter.com/cl564ktGIh
— . (@single_soul1) November 6, 2023
मॅथ्यूजच्या विकेटमुळे वाद
झाले असे की, सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज क्रीजवर उशिरा पोहोचला. त्यासोबतच तो मैदानावर तुटलेल्या हेल्मेटसह आला आणि त्याने डगाऊटमध्ये सहकारी खेळाडूला दुसरे हेल्मेट आणण्याची मागणी केली. मात्र, यामध्ये बांगलादेशचा कर्णधार शाकिबने मॅथ्यूजविरुद्ध पंचांकडे टाईम आऊट (Time Out) बादची अपील केली.
सुरुवातीला हे पाहून चेष्टा असल्याचे वाटले, पण पंचांनी ही अपील गांभीर्याने घेत मॅथ्यूजला नियमानुसार तंबूत जाण्यास सांगितले. मॅथ्यूज खूपच वेळ याबाबत पंच आणि शाकिबशी बोलला, पण अखेरीस त्याला मैदान सोडावे लागले.
बांगलादेशचा विजय
या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 279 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशन 41.1 षटकात 7 विकेट्स गमावत 282 धावा केल्या आणि सामना जिंकला. विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने श्रीलंकेला पहिल्यांदाच पराभवाची धूळ चारली. असे असले, तरीही हा सामना वादग्रस्त घटनांमुळे कायम चर्चेचा विषय ठरेल. (ban vs sl CWC 2023 bangladesh and sri lanka team players did not shake hands after match angelo mathews shakib al hasan)
हेही वाचा-
जगात रंगली मॅथ्यूजच्या टाईम आऊटची चर्चा; आता समोर येत चौथ्या अंपायरने केला मोठा खुलासा; म्हणाला…
‘शाकिबसाठी खूप आदर होता, पण आता…’, बांगलादेश संघ आणि अंपायरवर बरसला Angelo Mathews