---Advertisement---

टीम कोहलीचं टेन्शन वाढलं, हा खेळाडू वाढवणार संघाचं टेन्शन

On: सोमवार, डिसेंबर 30, 2019 3:24 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाची निवड झाली आहे.

मात्र या संघात निवड झालेला वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे आता त्याच्याऐवजी आता या मालिकेसाठी डॉर्सी शॉर्टची 14 जणांच्या ऑस्ट्रेलिया संघात निवड करण्यात आली आहे.

या संघात पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क आणि केन रिचर्डसन हे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वरच्या फळीतील फलंदाज शॉर्टला संघात संधी दिली आहे. तो फलंदाजीबरोबरच फिरकी गोलंदाजीही करु शकतो.

त्याच्या निवडीबद्दल ऑस्ट्रेलिया संघाचे निवडकर्ते ट्रेवर हॉन्स म्हणाले, ‘आयसीसी टी20 विश्वचषकाच्या आणि 2023 विश्वचषकाच्या आमच्या योजनेमधील ऍबॉट महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याचे संघातून बाहेर जाणे दुर्दैवी आहे.’

‘पण डॉर्सीच्या संघात येण्याने अष्टपैलू खेळाडूचा पर्याय मिळेल. त्याच्यासह ऍश्टॉन एगार असेल. तसेच चार वेगवान गोलंदाज संघात आहेत. त्याचबरोबर अ‍ॅडम झम्पामुळे देखील संघात संतुलन राखले जाईल. तसेच त्याच्यात फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे, ज्याचा संघाला फायदा मिळेल.’

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ही वनडे मालिका 14 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईला होणार आहे. तर दुसरा सामना 17 जानेवारीला राजकोट येथे आणि तिसरा सामना 19 जानेवारीला बंगळूरु येथे होणार आहे.

भारत दौऱ्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ – 

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), ऍश्टन एगार, ऍलेक्स कॅरी (उपकर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लॅब्यूशाने, केन रिचर्डसन, डॉर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ऍश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

https://twitter.com/Maha_Sports/status/1211571952231411713

https://twitter.com/Maha_Sports/status/1211544796474425344

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---