---Advertisement---

“तेथे तर दररोज…”, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी हरभजन सिंगचे पाकिस्तानवर खोचक वक्तव्य

On: शुक्रवार, जुलै 26, 2024 3:34 PM
Harbhajan-Singh
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या मते, टीम इंडिया पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जायला नाही पाहिजे. तो म्हणला की, बाजूच्या देशात सुरक्षेची खूप मोठी समस्या आहे. या माजी फिरकीपटूने बीसीसीआयच्या भूमिकेस समर्थन केले की, पाकिस्तानला जाण्यापूर्वी संघाने सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

बीसीसीआयने अद्याप या मुद्यावर आधिकृतरित्या कोणतेही विधान केलेले नाही. बोर्डाचे स्पष्ट म्हणणे आहे की, भारतीय सरकारच नक्की करेल की भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का नाही? आश्या स्थितीत हरभजन म्हणाला, भारतीय संघ पाकिस्तानात का जावे? पाकिस्तानात सुरक्षेची मोठी चिंता आहे. पाकिस्तानमध्ये अशी स्थिती आहे की रोज तेथे काय तर काय होतच असते. मला वाटत नाही की पाकिस्तानला जाणे संघासाठी सुरक्षित असेल. बीसीसीआयची भूमिका पूर्णपणे योग्य असून खेळाडूंच्या सुरक्षेपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. बीसीसीआयच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे.

तथापि, पाकिस्तानचे म्हणणे आहे की ते टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्येच होतील याची ते नक्की दक्षता घेतील. आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारतीय संघ त्याच हॉटेलमध्ये थांबेल, कारण एकाच शहरात राहून पुरेशी सुरक्षा व्यवस्था करणे सोपे जाईल, असेही सांगण्यात आले.

वास्तविक, भारतीय संघ देखील पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यासाठी न जाण्याच्या भूमिकेत आहे. काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले की, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील हार मानली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात यावे की नाही याचा निर्णय पीसीबीने आयसीसीवर सोडला आहे. 2023 मध्ये आशिया कपचे यजमानपद भूषवण्याची संधीही पाकिस्तानला मिळाली होती, मात्र टीम इंडियाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला भेट दिली नव्हती. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने आपले सामने श्रीलंकेत ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत खेळले. आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर काय निकाल लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा-

गौतम गंभीरचा स्पेशल प्लॅन, टीम इंडियातही होणार केकेआर प्रमाणे प्रयोग! हा खेळाडू घेणार सुनील नारायणची जागा
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक
‘क्रिकेट म्हणजे जीवन नाही’, कर्णधार झाल्यानंतर सूर्या मनापासून बोलला, पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---