जय हनुमान सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, बिभावी आयोजीत महिला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. तालुका जावळी, जिल्हा सातारा येथे दिनांक २० जानेवारी रोजी सातारा जिल्हा महिला कबड्डी स्पर्धा पार पडली. सातारा जिल्ह्यातील 14 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे विजेतेपद सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळांनी पटकाविले, श्री शिवाजी उदय संघाने ४२-०८ असा शिवछत्रपती प्रतिष्टान मेढा संघाचा पराभव केला. शिवछत्रपती प्रतिष्टान मेढा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर तिसरा क्रमांक शिवराय संघ जावली यांनी पटकवला.
स्पर्धातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सोनाली हेळवी श्री शिवाजी उदय मंडळ सातारा, उत्कृष्ट पकड नैनिका भोई, श्री शिवाजी उदय मंडळ सातारा, यांना गौरवण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सातारा जावळी चे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाला.
io
निकाल
विजेतेपद– श्री शिवाजी उदय मंडळ
उपविजेतेपद– शिवछत्रपती प्रतिष्टान मेढा
तिसरा क्रमांक- शिवराय संघ जावळी
सर्वोत्कृष्ट खेळाडू- सोनाली हेलवी
उत्कृष्ट पकड– नैनिका भोई
उत्कृष्ट चढाई- स्नेहा धनावडे