भारताची युवा ऑफ स्पिनर श्रेयंका पाटील महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. महिला सीपीएलमध्ये खेळणारी श्रेयांका पहिलीच भारतीय खेळाडू ठरेल. सीपीएल संघ गुयाना ऍमेझॉन वॉरिअर्स संघआने श्रेयांकाला करारबद्ध केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या पुरुष खेळाडूंना विदेशातील एकाही लीगमध्ये सहभाग घेण्याची परवानगी देत नाही. मात्र, महिला क्रिकेट संघाला ही अट लागू होत नाही. बीसीसीआयने आधिपासूनच महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना विदेशी लीग खेळण्याची परवानगी दिली आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), स्मृती मंधाना (Smriti Mandhana), जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodriguez), दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि ऋचा घोष (Richa Ghosh) या खेळाडू ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लगीमध्ये आणि इंग्लंड द हंड्रेड लीगमध्ये खेळल्या आहेत.
मागच्या वर्षीपासून बीसीसीआयने मायदेशात इंडियन प्रीमियर लीगप्रमाणे महिला प्रीमियर लीग देखील सुरू केली. श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) डब्ल्यूपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग राहिली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती कर्नाटक संघाचा भाग आहे. भारतासाठी पदार्पण करण्याआधीच तिला या विदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महिला एमर्जिंक एशिया कप स्पर्धेत श्रेयंकाने भारत अ संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले. या स्पर्धत तिला मालिकावीर पुरस्कार देखील दिला गेला. हाँगकाँगविरुद्ध च्या सामन्यात तिने दोन धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या होत्या. या स्पर्धेत तीने दोन सामने खेळले. यादरम्यान सात षटके गोलंदाजी करून आणि 15 धावा खर्च केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात तिने चार विकेट्स घेतल्यामुळे भारतीय संघाला एमर्जिंक एशिया कप जिंकणे सोपे झाले. (Shreyanka Patil becomes the first Indian to be part of women’s CPL!)
महत्वाच्या बातम्या –
‘गोल्डन बॉय’ नीरजचा पुन्हा ‘गोल्डन थ्रो’! लुसेन डायमंड लीगमध्ये पिछाडीवरून पटकावले सुवर्णपदक
पुन्हा रंगणार WPL चे मैदान! ऐन दिवाळीत रणरागिणींची ‘रन’धुमाळी?