सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये(Syed Mushtaq Ali Trophy) आज कर्नाटक विरुद्ध हरियाणा(Haryana vs Karnataka) यांच्या उपांत्य फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटकने 8 विकेट्सने सहज विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या सामन्यात कर्नाटककडून श्रेयस गोपाळने(Shreyas Gopal) 2 विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने 2019 या वर्षात ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे.
त्यामुळे तो ट्वेंटी20 मध्ये एका वर्षात 50 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे. तर एकूण गोलदाजांमध्ये एका वर्षात ट्वेंटी20 मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा चौथाच गोलंदाज ठरला आहे.
याआधी भारताकडून जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah), दीपक चाहर(Deepak Chahar) आणि खलील अहमद(Khaleel Ahmed) यांनी हा पराक्रम केला आहे. पण हे तिघेही वेगवान गोलंदाज आहेत. बुमराहने 2016मध्ये ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 57 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तर चाहर आणि खलीलने याचवर्षी (2019) हा पराक्रम केला आहे.
गोपळने आत्तापर्यंत यावर्षी 33 टी20 सामने खेळताना 51 विकेट्स घेतले आहेत.
एका वर्षात ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
57 – जसप्रीत बुमराह – 2016
51 – दीपक चाहर – 2019*
51 – श्रेयस गोपाळ – 2019*
50 – खलील अहमद – 2019*
हॅट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये ५ विकेट्स घेत अभिमन्यू मिथूनने रचला इतिहास
वाचा👉https://t.co/4YtqABX4e8👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #abhimanyumithun— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
राहुल द्रविडने आयपीएलमधील संघांना दिला हा महत्त्वाचा सल्ला; म्हणाला…
वाचा👉https://t.co/d5vTgtKIHw👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #IPL #RahulDravid— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019