भारत विरुद्ध इंग्लंड संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29 वा सामना खेळला गेला. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे पार पडला. सामन्याची नाणेफेक इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मा वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी निराशा केल्याने भारतीय संघ काहीसा संकटात सापडला. भारताचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर हा पुन्हा एकदा आखूड टप्प्याच्या चेंडूवर फसला.
https://www.instagram.com/reel/Cy-k-bIvxXP/?igshid=MzRlODBiNWFlZA==
सलग पाच सामने जिंकून या सामन्यात उतरलेल्या भारतीय संघासाठी सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल 9 आणि विराट कोहली शून्यावर बाद झाल्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. अशावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, 16 चेंडूंचा सामना केल्यानंतर तो केवळ चार धावा काढून बाद झाला.
बाराव्या षटकात ख्रिस वोक्स याने त्याला काही आखूड टप्प्याचे चेंडू टाकले. त्यावर श्रेयस मार्क वूड याच्या हाती झेल देऊन बाद झाला. श्रेयस अगदी सुरुवातीच्या काळापासून आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद होताना दिसतोय. त्याची ही उणीव सर्व संघांनी हेरली असून त्याच्याविरुद्ध अशाच चेंडूंचा मारा केला जातो.
तो सातत्याने अशा प्रकारे बाद होत असल्याने अनेकांनी त्याच्यावर टीका देखील करण्यास सुरुवात केली आहे. श्रेयस या विश्वचषकात अद्याप फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. केवळ पाकिस्तानविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली होती. विश्वचषकात पुढील काळात त्याच्या जागी ईशान किशन हा देखील खेळताना दिसू शकतो.
(Shreyas Iyer Again Out Against Short Ball In ODI World Cup)
हेही वाचा-
झहीर टॉपला असलेल्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर, नकोशा विक्रमात सचिनला टाकले मागे
विश्वचषक 2023मध्ये भारत पहिल्यांदाच करणार ‘हे’ काम, इंग्लंडने जिंकला टॉस; Playing XIमध्ये नाही कोणताच बदल