भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी वादळी फलंदाजी केली. या दोघांमध्ये 138 चेंडूत 150 धावांची भागीदारी पार पाडली. भारतीय संगाच्या इतिहासातील ही तिसऱ्या विकेटसाठी झालेली दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. श्रेयसने शतक ठोकले, तर इशान किशन अवघ्या काही धावा कमी पडल्यामुळे शतक करू शकला नाही.
इशान किशन या सामन्यात एकूण 84 चेंडू खेळला आणि 93 धावा कुटल्या. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर याने शतकीय खेळी केली. श्रेयसने या सामन्यात एकूण 111 चेंडू खेळले आणि नाबाद 113 धावा केल्या. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी मिळूण या सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी एकूण 161 धावांचे योगदान दिले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या इतिसाहातील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी झालेली दुसरा सर्वात मोठी भागादीरा ठरली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आणि अजिक्य रहाणे आहेत, ज्यांना भारतासाठी आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 189 धावांची भागीदारी केली होती. तसेच तिसऱ्या क्रमांकावर दिग्गज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांची नावे आहेत, ज्यांनी भारतासाठी एकदिवसीय सामना खेळताना 158 धावांची भागीदारी केली होती.
9⃣3⃣ Runs
8⃣4⃣ Balls
4⃣ Fours
7⃣ SixesWhat a stunning knock that was from @ishankishan51! 🔥 🔥
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKAJW7 #TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/OZYyVrX1xG
— BCCI (@BCCI) October 9, 2022
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करणारे खेळाडू
189 – विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे
161 – इशान किशन आणि श्रेयस अय्यर
158 – सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड
💯 for @ShreyasIyer15 – his second ODI ton! 🙌 🙌
The #TeamIndia vice-captain has been sensational in the chase. 💪 💪
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKAJW7 #INDvSA pic.twitter.com/oTsx3OtJr2
— BCCI (@BCCI) October 9, 2022
दरम्यान उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर भारातने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. मोहम्मद सिराजने 10 षटकात 3.80 च्या इकोनॉमीने 38 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 3 विकेट्स देखील घेतल्या. आफ्रिकी संघ प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 278 धावांपर्यंत मजल मारू शखला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य 3 विकेट्सच्या नुकसानावर आणि 45.5 षटकात गाठले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रेयस-इशानच्या तुफानाने मालिका बरोबरीत! रांची वनडेत टीम इंडिया वरचढ
रांचीचा नवा राजकुमार! घरच्या मैदानावर इशान किशनचा धमाका; वादळी खेळीने मिळवली वाहवा