मुंबई। रविवारी (१० एप्रिल) ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर एकमेकांची पायखेची खेचताना दिसले आहेत. त्याचा व्हिडिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरंतर शार्दुल (Shआणि श्रेयस हे दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून एकत्र खेळतात. त्यामुळे अनेकवर्षे एकमेकांना ओळखत असल्याने त्यांच्यत चांगली मैत्री आहे. पण, आयपीएल २०२२ मध्ये श्रेयस कोलकाताकडून आणि दिपक दिल्लीकडून खेळतो. त्यामुळे रविवारी हे दोघेही आमने-सामने होते. त्याच पार्श्वभूमीवर या दोघांनीही एकमेकांची खिल्ली उडवत एकमेकांचा आव्हान दिले होते. हा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट झाला होता.
या व्हिडिओमध्ये दिसते की, श्रेयसने ब्रेबॉर्नवर होणाऱ्या सामन्यापूर्वी शार्दुलला चेतावणी दिली की, त्याचा या मैदानावरील रेकॉर्ड चांगला आहे आणि त्याचमुळे या मैदानात त्याच्यापासून सावध रहा. शार्दुलनेही त्याच्या तोडीस तोड उत्तर दिले. तो म्हणाला की, त्यानेही श्रेयसला नेट्समध्ये अनेकदा चकवलं आहे. त्यावर श्रेयसने त्याची खिल्ली उडवत म्हणूनच त्याला नेट्स म्हणतात, असे उत्तर दिले. या दरम्यान, शार्दुल श्रेयसला असेही म्हणतो की, ‘मुंबईचा आहे म्हणून खूप शाना बनतोय का?’ यानंतर ते एकमेकांना आव्हान देतात.
दरम्यान, श्रेयसने म्हणल्याप्रमाणे त्याने ब्रेबॉर्नला शानदार खेळी करत ५४ धावांची खेळी केली. मात्र, तरीही कोलकाताला या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. शार्दुलनेही या सामन्यात दिल्लीकडून चांगली कामगिरी केली. त्याने ११ चेंडूत आक्रमक नाबाद २९ धावांची खेळी केली, तर गोलंदाजीत २ विकेट्स घेतल्या (Shreyas Iyer and Shardul Thakur sledge each other before match).
Friendly banter or sledging? We'll leave it to you to decide! 😁@ShreyasIyer15 @imShard #KKRHaiTaiyaar #KKRvDC #IPL2022 pic.twitter.com/z4xaNuO9kU
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 10, 2022
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २१५ धावा केल्या होत्या. त्यानंतर २१६ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघ १९.४ षटकांत १७१ धावांवर सर्वबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: राडा राडा! चालू सामन्यात चहल-सॅमसन पंचांशी भिडले, जाणून घ्या काय झाला वाद
युजवेंद्र चहल १५० आयपीएल विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज, जाणून घ्या अन्य ५ जणांची नावं
Video : आऊट नसताना दोनदा Out दिला आणि जेव्हा खरंच Out होता तेव्हा रहाणेनी ‘चिटींग’ केली