भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे खेळला जात आहे. रविवारी (दि. 24 सप्टेंबर) या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताची सुरुवात सुरुवात खास झाली नाही, पण नंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत अर्धशतक साजरे केले. या दोघांमुळे भारतीय संघाने 100 धावांचा टप्पाही पार केला.
शुबमन गिल चमकला
भारतीय संघाकडून या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या रूपात पहिल्या झटका बसला होता. ऋतुराज यावेळी जोश हेझलवूड याच्या गोलंदाजीवर चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेच्या हातून झेलबाद झाला. यावेळी ऋतुराज 8 धावा करून तंबूत परतला. मात्र, शुबमन गिल याने श्रेयस अय्यर याच्यासोबत भारताचा डाव सावरला. गिलने यावेळी सावकाश सुरुवात केली, पण नंतर त्याने चांगली फटकेबाजी केली. त्याने सुरुवातीच्या 19 चेंडूत 9 धावा केल्या होत्या. मात्र, पुढील 18 चेंडूत त्याने 41 धावांचा पाऊस पाडला. अशाप्रकारे त्याने 37 चेंडूत अर्धशतक साकारले. या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश होता.
शुबमन गिल याचे हे वनडेतील 10वे अर्धशतक होते. त्याने अवघ्या 35 डावांमध्ये 5 शतके आणि 10 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. विशेष म्हणजे, 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षात शुबमन गिल याने 70 हून अधिकच्या सरासरीने धावा कुटल्या आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1705879329467678915
श्रेयस अय्यरचेही अर्धशतक
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला फलंदाज श्रेयस अय्यर यानेही अवघ्या 41व्या चेंडूवर षटकार खेचत अर्धशतक झळकावले. त्याने यावेळी 1 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊसही पाडला. हे अय्यरचे पुनरागमनानंतरचे पहिले वहिले अर्धशतक आहे.
Shreyas Iyer joins the party with a 41 ball FIFTY ????????
Live – https://t.co/OeTiga5wzy… #INDvAUS @IDFCFIRSTBank pic.twitter.com/EW8syRgVXq
— BCCI (@BCCI) September 24, 2023
भारताच्या 150 धावा पूर्ण
शुबमन गिल (70) आणि श्रेयस अय्यर (74) यांच्यात 20व्या षटकापर्यंत नाबाद 146 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीसह भारतीय संघाने आपल्या 150 धावांचा टप्पाही पार केला. (shreyas iyer and shubman gill score half century india crossed 150 plus runs)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकात श्रीलंकेचं सगळंच अवघड! स्टार खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट, Asia Cup 2023लाही मुकलेला
Toss: विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने बदलला कर्णधार, भारताच्या ताफ्यात ‘या’ खेळाडूची एन्ट्री






