---Advertisement---

चला थोडं हसूया! सूर्यकुमारच्या शोमध्ये श्रेयसची भरपूर मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मुलाखतीचा व्हिडिओ

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 10:23 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांची ४ छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोन्ही भारतीय खेळाडू मस्करीच्या मूडमध्ये दिसत आहेत. दोघांनी माईक धरला आहे आणि दोन्ही एकमेकांसोबत हास्य विनोद करतांना दिसत आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ही छायाचित्र टिपण्यात आली होती.

पहिल्या दिवसाच्या ७५ धावांचा खेळ पुढे खेळताना अय्यरने १७१ चेंडूत १०५ धावा केल्या. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा सोळावा क्रिकेटपटू ठरला. या यादीत लाला अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत.

पदार्पणाच्या कसोटीत श्रेयस अय्यरचे शतक सोडल्यास, दुसऱ्या दिवसाचा खेळ न्यूझीलंडच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी काइल जेमिसननंतर टीम साऊथीने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात गोलंदाजीने वर्चस्व गाजवले. तर विल यंग आणि टॉम लॅथमने दुसऱ्या सत्रात भारताच्या अनुभवी गोलंदाजांचे दडपण येऊ दिले नाही. न्यूझीलंडच्या सलामीवीरांना ना इशांत शर्माचा वेग रोखू शकला ना रविचंद्रन अश्विनची फिरकी.

शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने बिनबाद १२९ धावा केल्या आहेत. विल यंग १८० चेंडूत नाबाद ७५ आणि टॉम लॅथम १६५ चेंडूत ५० धावा करून नाबाद आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या होत्या. मयंक अग्रवालने १३, शुभमन गिलने ५२, चेतेश्वर पुजाराने २६, अजिंक्य रहाणेने ३५, श्रेयस अय्यरने १०५, रवींद्र जडेजाने ५०, साहाने १, अश्विनने ३८, अक्षर पटेलने ३ आणि उमेशने १० धावा केल्या. भारतीय संघ अजूनही २१६ धावांनी पुढे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोई शहरी बाबू… रोहित, शार्दुलसोबत भारी डान्स करत शतकवीर श्रेयसने केले सेलिब्रेशन; व्हिडिओ पाहाच

चढले तेज हळदीचे! राजस्थान रॉयल्सचा राहुल तेवतिया चढणार बोहल्यावर, हळदी समारंभाचे फोटो केले शेअर

रहस्य उलगडलं! ‘डेब्यू कॅप’ देताना असे काही म्हणाले होते गावसकर, श्रेयसलाही नव्हती या गोष्टीची कल्पना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---