Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोई शहरी बाबू… रोहित, शार्दुलसोबत भारी डान्स करत शतकवीर श्रेयसने केले सेलिब्रेशन; व्हिडिओ पाहाच

November 26, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Screengrab: Instagram/@rohitsharma45

Screengrab: Instagram/@rohitsharma45


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या खेळला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी युवा खेळाडू श्रेयस अय्यरने पदार्पण केले. त्याने या सामन्यात पहिल्या डावात महत्वाची शतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने मोठे आव्हान उभे केले. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक केल्यानंतर श्रेयस त्याचा आनंद साजरा करत आहे. रोहित शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये श्रेयस डान्स करताना दिसत आहे.

रोहितने हा व्हिडिओ १९७३ मधील चित्रपट लोफरमधल्या “कोई शहरी बाबू” या गाण्यावर तयार केला आहे. या गाण्यावर रोहित स्वतः, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकुर हे तिघे डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओत हे तिन्ही भारतीय खेळाडू हसताना दिसत आहेत. त्यांनी स्वतः या गाण्यावर डान्स स्टेप्स बसवल्या आहेत.

रोहितने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “वेल डन श्रेयस, सगळे मुव्ह योग्यप्रकारे केले.” चाहत्यांना या तिघांचा हा अंदाज चांगलाच भावल्याचे दित आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

व्हिडिओवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने प्रतिक्रिया दिली आहे. तिने प्रतिक्रिया देतेना लिहिले, “लिटिल ट्विन्कल टोज.” याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर, दिनेश कार्तिक यांच्यासह इतरही दिग्गजांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत डान्सचे कौतुक केले आहे. तत्पूर्वी रोहित शर्माने एका दिवसापूर्वीच श्रेयस अय्यरचे कौतुक करणारे एक ट्वीट केले होते.

रोहितने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर प्रचंड वेगाने व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने ही पोस्ट केल्यानंतर एका तासात या व्हिडिओला एक मिलियन लोकांनी पाहिला आहे आणि त्यापैकी ३ लाखापेक्षा जास्त चाहत्यांनी त्याला लाइक केले आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यरने माकिलेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात १७१ चेंडूंचा सामना केला आणि १३ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १०५ धावा केल्या. भारतीय संघ सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १११.१ षटकांत ३४५ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या. भारतीय संघ सध्या २१६ धावांनी आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चढले तेज हळदीचे! राजस्थान रॉयल्सचा राहुल तेवतिया चढणार बोहल्यावर, हळदी समारंभाचे फोटो केले शेअर

‘हे’ चौघे द्रविडच्या निरोप सामन्यात होते त्याचे टीममेट्स, आता त्याच्याच प्रशिक्षणाखाली खेळतायत कानपूर कसोटी

आहा कडकच ना! पती शोएब मलिकसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार सानिया मिर्झा? व्हिडिओ व्हायरल


Next Post
Photo Courtesy: Twitter/@BCCI

चला थोडं हसूया! सूर्यकुमारच्या शोमध्ये श्रेयसची भरपूर मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मुलाखतीचा व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/@BCCI

ग्रीन पार्कच्या वादात राहिलेल्या क्युरेटरचा खुलासा; म्हणाला, 'मला इलेक्ट्रिशियन वरून पिच क्युरेटर करण्यात आले'

Photo Courtesy:
Twitter/@EnglandCricket

ऍशेस मालिकेसाठी सज्ज होतोय बेन स्टोक्स, गाबामध्ये इंग्लिश गोलंदाजांची केली जोरदार धुलाई- Video

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143