नवी दिल्ली| विराट कोहली हा सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो केवळ भारतीय संघातच नव्हे तर जगभरातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. त्याने त्याच्या तंदुरुस्तीनेने भारतीय संघातील क्रिकेटपटूंनाही प्रेरणा दिली आहे. अशातच श्रेयस अय्यरला कोहली आणि हार्दिक पंड्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला.
इएसपीएन क्रिकइन्फोशी चर्चा करत असताना अय्यर याला विचारण्यात आले की विराट कोहली व हार्दिक पंड्या यांच्यातील पंजा लढाई (आर्म-रेसलिंग) कोण जिंकेल. यावर अय्यरने विराटचे नाव घेतले. पण त्याने पंड्याचे फिजिकही चांगले असल्याचे सांगितले.
या संभाषणात त्याने कोहलीबद्दल आणखी एक खुलासा केला. खुलासा करतांना अय्यर म्हणाला की तो विराट कोहलीला खूप मेसेज करतो आणि दोघेही घड्याळांविषयी बोलतात. विराटची प्रशंसा करताना श्रेयस म्हणाला, “कोहली सर्व तरुणांसाठी एक आदर्श आहे.”