राजकोट। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात गुरुवारी (7 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना(2nd T20I) पार पडला. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) पार पडलेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात रोहित शर्मा 85 धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फटके मारताना 13 चेंडूत नाबाद 24 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
त्याने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये (सर्वप्रकारच्या टी20 स्पर्धा) 2019 या वर्षात 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. 2019 या वर्षात हा टप्पा पार करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचे आता ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 30 सामन्यात 1014 धावा झाल्या आहेत.
अय्यर ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 2019 या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण क्रिकेटपटूंच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम आहे. त्याने आत्तापर्यंत ट्वेंटी20मध्ये 2019 या वर्षात 1607 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर 2019 मध्ये ट्वेंटी20 क्रिकेटमधे सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत अय्यरच्या पाठोपाठ सुर्यकुमार यादव आहे. यादवने 27 सामन्यात 784 धावा केल्या आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. धवनने 27 सामन्यात 774 धावा केल्या आहेत.
ही दोस्ती तुटायची नाय! रोहित-शिखर जोडीने रचलायं हा मोठा विश्वविक्रम
वाचा????https://t.co/dZxMNVeNAj????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia #Cricket #RohitSharma #ShikharDhawan— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019
सचिन तेंडुलकर प्रमाणेच रोहित शर्माने टी२०त केलाय हा मोठा विक्रम!
वाचा???? https://t.co/K8P9tEfnmc ????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia #Cricket #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019






