सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मॉन्गुई येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 191 धावा धावफलकावर लावल्या. त्याचवेळी भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर हा विचित्र पद्धतीने हिट विकेट झाला. यासह टी20 मध्ये तो हिट विकेट होणारा तो चौथा भारतीय ठरला.
प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघासाठी श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. आशिया चषक व टी20 विश्वचषकात संधी न मिळालेला श्रेयस तब्बल दोन महिन्यानंतर भारतीय संघासाठी खेळत होता. या सामन्यात त्याच्याकडून संघाला व चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र, 9 चेंडूंवर 13 धावा काढून तो लॉकी फर्ग्युसन टाकत असलेल्या तेराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हिट विकेट झाला.
टी20 क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने हिट विकेट बाद होणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. भारतासाठी सर्वप्रथम केएल राहुल 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अशा पद्धतीने बाद झालेला. मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्धच हर्षल पटेल हा देखील याच पद्धतीने बाद झाला होता. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातही अखेरच्या चेंडूवर हार्दिक पंड्या याच पद्धतीने बाद झालेला.
या सामनाबद्दल बोलायचं झाल्यास भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले होते. इशान किशनने सलामीला उतरताना 36 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवने एकहाती न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 51 चेंडूवर 111 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी टीम साऊदीने हॅट्रिकसह तीन बळी मिळवले.
(Shreyas Iyer Becomes Fourth Indian Who Out Hit Wicket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनपाठोपाठ कार्तिकनेही घेतली द्रविडची बाजू; म्हणाला, ‘2023च्या वनडे विश्वचषकानंतर मला…..’
गिलने सांगितली रिषभ-उर्वशी वादाची सत्यता; म्हणाला, “तिलाच वाटते…”