सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे सुरु आहे. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यर याने अर्धशतक झळकावत एक इतिहास घडवला आहे. त्याने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकासह तो चालू वर्षांमध्ये भारतासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज बनला आहे.
मागील वर्षीच भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केलेल्या श्रेयसने या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी घेतली. त्याने वनडे क्रिकेटमध्ये सुरू असलेला आपला शानदार फॉर्म कायम राखला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने 169 चेंडूंचा सामना करताना 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. या अर्धशतकासह तो चालू वर्षात क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज बनला.
श्रेयसने यावर्षी 38 डाव खेळत 1489 धावा केल्या आहेत. त्याने या खेळी दरम्यान मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा चोपलेल्या सूर्यकुमार यादव याला पिछाडीवर टाकले. सूर्यकुमारने यावर्षी भारतासाठी 43 डावांत 1424 धावा केल्या होत्या. तर, अनुभवी विराट कोहली याने 39 डाव खेळताना 1304 धावा केल्या होत्या आहेत. रिषभ पंत व भारतीय कर्णधार रोहित शर्मा हे अनुक्रमे 1287 व 995 धावांसह चौथ्या व पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाअखेर भारताने 90 षटकांमध्ये 6 गडी गमावत 278 धावा केल्या. या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यर यांचे महत्वाचे योगदान होते. पुजारा 203 चेंडूत 90 धावा करत बाद झाला, तर श्रेयस अय्यर 82 धावांवर नाबाद आहे.
(Shreyas Iyer Becomes Highest Run Scorer For India In 2022)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीब असावं तर असं! क्लिन बोल्ड होऊनही बाद झाला नाही श्रेयस अय्यर, पाहा व्हिडीओ
शेवटच्या वेळी जेव्हा केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झालेला, तेव्हा निकाल काय होता?