Shreyas Iyer New Apartment In Mumbai :- भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि त्याची आई रोहिणी अय्यर (Shreyas Iyer Mother) यांनी मुंबईतील वरळी परिसरात 525 स्क्वेअर फुटांचे अपार्टमेंट विकत घेतले आहे . त्याची किंमत 2.90 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांवरून ही बाब समोर आली. वरळीच्या आदर्श नगर भागात त्रिवेणी इंडस्ट्रियल सीएचएसएलच्या दुसऱ्या मजल्यावर अपार्टमेंट आहे.
कागदपत्रांनुसार, 525 स्क्वेअर फुटांचे हे अपार्टमेंट 55,238 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने खरेदी करण्यात आले आहे. हा व्यवहार 19 सप्टेंबर 2024 रोजी नोंदणीकृत झाला, ज्यासाठी 17.40 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले. यापूर्वी, श्रेयसने मुंबईतील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या लोढा वर्ल्ड टॉवर्सच्या 48 व्या मजल्यावर 2,380 चौरस फुटांचे घर 49,817 रुपये प्रति चौरस फूट या दराने विकत घेतले होते.
जुलै 2024 मध्ये श्रेयस मुंबईत व्यावसायिक मालमत्ता खरेदी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. मिळवलेल्या कागदपत्रांवरून त्यांनी वरळी परिसरात 2.9 कोटी रुपयांना व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
श्रेयसने नुकतेच दुलिप ट्रॉफीमध्ये इंडिया डीचे प्रतिनिधित्व केले. मात्र, यात त्याची कामगिरी काही खास नव्हती.
त्यामुळेच त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले नाही . त्याने दुलिप ट्रॉफीच्या 3 सामन्यांच्या 6 डावात 25.66 च्या सरासरीने केवळ 154 धावा केल्या. त्याने आपल्या बॅटने 2 अर्धशतके झळकावली.आता तो इराणी कपमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
मागील काही काळापासून श्रेयस भारतीय संघाबाहेर होता. शिस्तभंग केल्यामुळे त्याला भारतीय संघातून बाहेर केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, केकेआर संघाला कर्णधार म्हणून आयपीएल जिंकून दिल्यावर त्याचे भारताच्या मर्यादित षटकांच्या संघामध्ये पुनरागमन झालेले. मात्र, कसोटी संघापासून तो आता दूर आहे.
हेही वाचा-
‘मन’ खूप झालं आता ‘जग’ जिंकायचंय! टी20 विश्वचषकापूर्वी कर्णधार हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाला चेतावणी
भारत वि. बांगलादेश संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठा गोंधळ, कानपूर स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ
सचिनच्या मुलाची देशांतर्गत क्रिकेटमधून करोडोंची कमाई! त्याची एकूण संपत्ती किती?