भारतीय क्रिकेट संघानं नुकतीच बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत टीम इंडियानं 2-0 असा जबरदस्त विजय मिळवला. यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध पुढील मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम दुलीप ट्रॉफी आणि त्यानंतर इराणी चषक खेळला गेला.
इराणी चषक 2024 चा सामना मुंबई आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ यांच्यात खेळला गेला. मात्र यामध्ये टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर काही विशेष कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात अय्यर मुंबईच्या संघाकडून खएळतोय. त्यानं पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं, मात्र दुसऱ्या डावात तो 12 चेंडूत 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
श्रेयस अय्यर दुलीप ट्रॉफीमध्येही फारशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यानंतर आता तो इराणी चषकातही आपली छाप सोडू शकला नाही. अशा परिस्थितीत आता त्याच्यावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याचा धोका आहे.
जर आपण श्रेयस अय्यरबद्दल बोललो, तर तो दुलीप ट्रॉफीच्या तीनही सामन्यांत फ्लॉप ठरला होता. त्याला एकाही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. यामुळे त्याची बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाली नाही. मात्र, तो इराणी चषकाद्वारे पुनरागमन करू शकला असता.
श्रेयस अय्यरनं इराणी चषकाच्या दोन्ही डावांत मोठी खेळी केली असती किंवा कोणत्याही एका डावात 150 किंवा 120-130 धावा केल्या असत्या, तर त्याच्या पुनरागमनाच्या आशा निर्माण झाल्या असत्या. मात्र पहिल्या डावात 57 धावा केल्यानंतर तो दुसऱ्या डावात 8 धावा करून बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंड मालिकेत त्याला संधी मिळेल असं वाटत नाही.
भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून हे सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
हेही वाचा –
“धोनी नाही, हा आहे जगातील सर्वोत्तम फिनिशर”, कुमार संगकाराचं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा फुसका बार! विश्वचषकात नोंदल्या गेला लाजिरवाणा रेकॉर्ड
न्यूझीलंडनंतर आता भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान, सामन्यापूर्वी पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड