---Advertisement---

“… यामुळे मी भाग्यवान आहे”, चेन्नईविरुद्ध मिळविलेल्या विजयाबद्दल श्रेयस अय्यरने दिली प्रतिक्रिया

---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सातवा सामना काल(26 सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) या संघादरम्यान खेळला गेला. या सामन्यात सीएसकेचा 44 धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने, 20 षटकांत 3 गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 131 धावाच करू शकला.

सामना संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या कामगिरीमुळे खूप आनंदित होता. त्याने आपल्या संघाच्या खेळाडूंची प्रशंसा केली.

संघाच्या कामगिरीवर आहे खुश

तो म्हणाला, “ संघाच्या या कामगिरीमुळे मी खरोखर खूष आहे. तथापि, आमच्या संघातील खेळाडूंनी झेल सोडले. मी त्यांना दोष देणार नाही कारण इथल्या परिस्थितीत झेल घेणे खूप अवघड आहे.”

योजनेत झाले यशस्वी

संघाच्या योजनांबद्दल तो म्हणाला, “संघाच्या बैठकीत आम्ही ठरवले की आम्ही प्रथम खेळपट्टीच्या स्थितीचे मूल्यांकन करू आणि त्यानंतर त्यानुसार फलंदाजी करू. आम्ही या योजनेत बर्‍याच प्रमाणात यशस्वीही झालो आहोत.”

खेळाडू घेत आहेत यशाचा आनंद

संघातील खेळाडूंची प्रशंसा करतांना तो म्हणाला, “आमच्या सलामीवीरांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. आमच्या डावाच्या शेवटच्या षटकातही फलंदाजांनी उत्तम फटकेबाजी केली. मी भाग्यवान आहे कारण माझ्या संघात कगिसो रबाडा आणि एन्रीच नोर्किए हे गोलंदाज आहेत. संघातील सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. सर्वच खेळाडू या यशाचा आनंद घेत आहेत.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---