---Advertisement---

सततच्या फ्लॉप शोनंतर अखेर फॉर्म आला, दुलीप ट्रॉफीत अय्यरची टी20 स्टाईल बॅटिंग

On: शनिवार, सप्टेंबर 21, 2024 3:15 PM
---Advertisement---

दुलीप ट्रॉफी 2024 च्या 5व्या सामन्यात इंडिया ‘बी’ समोर इंडिया ‘डी’चं आव्हान आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात स्टार फलंदाज श्रेयस अय्यरनं तुफानी खेळी केली.

आतापर्यंत सतत अपयशी ठरत असलेल्या इंडिया डी संघाचा कर्णधार अय्यरनं दुसऱ्या डावात झंझावाती अर्धशतक झळकावलं. त्यानं 37 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. तो 40 चेंडूत 125 च्या स्ट्राईक रेटनं 50 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्यानं 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याला मुकेश कुमारनं मोहित अवस्थीकरवी झेलबाद केलं. श्रेयस अय्यरनं याआधी पहिल्या डावात खातंही उघडलं नव्हतं. त्यानं 5 चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव काढली नाही. राहुल चहरनं त्याची विकेट घेतली होती.

दुलीप ट्रॉफीत श्रेयस अय्यरची आतापर्यंतची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. त्यानं इंडिया सी विरुद्ध पहिल्या डावात 9 आणि दुसऱ्या डावात 54 धावा केल्या. यानंतर इंडिया ए विरुद्धच्या सामन्यात अय्यर पहिल्या डावात अपयशी ठरला होता. दुसऱ्या डावात त्यानं 41 धावा केल्या.

श्रेयस अय्यरला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळालं नाही. यापूर्वी त्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून बाहेर करण्यात आलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमधील अय्यरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं 74 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 126 डावांमध्ये 5768 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं 31 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद 202 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा – 

शुबमन गिलच्या एका शतकानं मोडले अनेक रेकॉर्ड, ‘प्रिंस’ची सचिन-विराटच्या खास क्लबमध्ये एंट्री
भारताचा दुसरा डाव घोषित, बांग्लादेश समोर 515 धावांचे तगडे लक्ष्य; गिल-पंतची शतकी खेळी!
शाकिब अल हसनचं नाव इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---