वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा वनडे सामना भारतीय संघाने २ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यासह भारतीय संघाने ३ सामन्यांची वनडे मालिकाही २-० च्या फरकाने खिशात घातली आहे. या सामना विजयात भारतीय संघाकडून गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि फलंदाजीत अक्षर पटेल, संजू सॅमसन आणि शुबमन गिल यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. याबरोबरच श्रेयर अय्यर याचाही मोठा वाटा राहिला. अय्यरने या सामन्यात अर्धशतक केले. यादरम्यान एक नवीन विक्रमही त्याच्या नावावर झाला आहे.
श्रेयसने (Shreyas Iyer) त्याच्या वनडे कारकिर्दीतील १०० चौकार (Hundred Fours In ODI) पूर्ण केले आहेत. वेस्ट इंडिजच्या ३१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयसने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक ठोकले. ७१ चेंडू खेळताना १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६३ धावा फटकावल्या. यादरम्यान त्याचे वनडे क्रिकेटमधील १०० चौकार पूर्ण झाले.
पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यापूर्वी श्रेयसच्या खात्यात ९८ चौकारांची नोंद होती. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने ४ चौकार मारत १०० चौकारांचा आकडा पार केला. आता त्याच्या खात्यात १०२ चौकार आहेत. २९ वनडे सामने खेळताना त्याने हा आकडा गाठला आहे. यासह तो सचिन तेंडूलकर, सनथ जयसूर्या यांसारख्या दिग्गजाच्या यादीत सामील झाला आहे.
सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम माजी भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. त्याने ४६३ वनडे सामने खेळताना तब्बल २०१६ चौकार मारले आहेत. तर श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने १५०० चौकार मारले आहेत. त्यानंतर श्रीलंकन दिग्गज कुमार संगकारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १३८५ चौकार मारले आहेत. तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ११५९ षटकारांसह या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडू मारायचा एकीकडे होता, पण गेला दुसरीकडे; पाहा शुबमन गिलने विचित्र पद्धतीने गमावलेली विकेट
WIvsIND: वनडे मालिका जिंकत कर्णधार धवन दिग्गजांच्या यादीत सामील; रोहितलाही न जमलेला पराक्रम नावे
अर्रर्र! वनडे मालिका जिंकूनही भारताच्या ताफ्यात निराशेची लहर, झालंय मोठं नुकसान